अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक झाली. त्यात भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना चीतपट केलं. ही तर विखेंचीच किमया, असं नूतन जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी सांगून विराेधकांवर चांगलाच हल्लाबाेल केला.
नवीन पान सुपारी सम्राट कोण? हे महाराष्ट्राने ओळखावं, गजानन काळेंचा पवारांना टोला
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर शिवाजी कर्डिले यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडीला आम्हाला एक वर्षांसाठी अध्यक्षपदाची संधी द्या, अशी विनंती करूनही त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा फाॅर्म भरला.
मविआने थोपटले दंड… छत्रपती संभाजीनगरमधून पहिली तोफ धडाडणार
त्यातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हीसीद्वारे जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात घ्या, अशा स्पष्ट सूचना दिल्या. विखे कुटुंबीयांची किमया झाली अन् अध्यक्षपदासाठी निवडून आलाे. त्यामुळं मतदारांचे मनापासून आभार, मी गेल्या १५ वर्षांपासून बँकेचा संचालक असल्याचं त्यांनी यावेळी स्प्ष्ट केलं.
महिला दिनी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ब्रेस्ट कँसर रुग्णांसाठी मोठं गिफ्ट
तसेच ही बँक शेतकरी, सर्वसामान्यांची आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त लाभ मिळवून देणार आहे. त्याचबराेबर सर्व संचालकांना एकत्रित घेऊन बँकेचा कारभार चालवणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023: या आहेत भारतातील पाच शक्तिशाली महिला
दरम्यान, या निवडणुकीत एकूण २० मतांपैकी कर्डिले यांना दहा, तर घुले यांना नऊ मते मिळाली असून एक मत बाद झाले आहे. दाेन्ही उमेदवारांना मत दिल्यानं मत बाद झाल्याचे समजते.