Download App

देवदर्शनावरून परतत असलेल्या भाविकांवर काळाची झडप; ६ ठार

  • Written By: Last Updated:

सोलापूर : अक्कलकोट (Akkalkot accident) येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला दुपारी ४ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी वळणावर क्रुझर आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण धडक (Cruiser and truck accident) झाल्यानं ही अपघाताची घटना घडली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Six devotees killed in road accident near Akkalkot Seven injured)

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या अक्ककोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ हा अपघात झाला. ट्रक आणि क्रुझरमध्ये हा अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. मृत झालेले सर्व भाविक हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील अनूर गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बीआरएसने दिलेल्या ऑफरवर विचार करणार नाही असं नाही; पंकजा मुडेंचं सूचक वक्तव्य 

अणूर (ता. आल्दम, जि. गुलबर्गा) येथील महिला भाविक स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट येथे आले होते. स्वामी समर्थ मंदिरातून दर्शन घेऊन क्रुझरने घरी परतत होते. दरम्यान, क्रुझर (केए ३५ ए ७४९५) आणि सिमेंट ट्रकची (एमएच १२ यूएम ७१८६) समोरासमोर धडक झाल्यानं मोठा अपघात झाला. ट्रकला पाठीमागून क्रुझर गाडीची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. या नागरिकांनी पोलिसांनी या अपघाताची माहिती देऊन अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील डॉ.अंजूम सय्यद, डॉ.घंटे आदी डॉक्टरांची टीम जखमींवर उपचार करत आहे.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पंचनामा करत आहेत. दरम्यान, या अपघातात क्रूझरमधील महिला आणि लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांची नावे –

1) संगीता मदन माने (वय 35) रा. बेडगे ता . उमरगा

2) सुंदराबाई भारतासिंग राजपूत (वय 55) रा अन्नुर ता.आळंद

3) ललीता महादेव बग्गे (वय 50 रा अन्नुर)

4) साईनाथ गोविंद पुजारी (वय 10 रा अन्नुर)

5) रोहिणी गोपाळ पुजारी (वय 40 रा अन्नुर ता.आळंद) असे पाच मयताची नांवे असुन

6) एका मयत महिलेची ओळख पटली नाही.

 

Tags

follow us