बीआरएसने दिलेल्या ऑफरवर विचार करणार नाही असं नाही; पंकजा मुडेंचं सूचक वक्तव्य

बीआरएसने दिलेल्या ऑफरवर विचार करणार नाही असं नाही; पंकजा मुडेंचं सूचक वक्तव्य

Pankaja Munde : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी त्यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) देशभर नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. राज्यातील अनेक माजी आमदार-खासदारांसह बडे नेते ‘बीआरएस’ पक्षात दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचा फटका दोन्ही काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ‘बीआरएस’ने मुख्यमंत्रीपदाची मोठी ऑफर दिली होती.यावर आज पंकजांनी भाष्य केलं. मला आलेल्या ऑफरवर मी गांभीर्याने पाहिले नाही, पण मी पाहणार नाही, असं अजिबात नाही असं सूचक विधान त्यांनी केलं. (Pankaja Mundes reaction to BRS partys offer of Chief Ministership)

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. या सभेपूर्वी पंकजा मुंडेंनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी बीआएसने दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, सर्वच पक्ष माझ्याबाबत सकारात्मक बोलत आहेत. कोणी माझ्याबद्दल सकारात्मक बोलले तर मी कोणाबद्दल नकारात्मक बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला मिळालेल्या ऑफरकडे मी गांभीर्याने पाहिले नाही. पण मी पाहणारच नाही, असं अजिबात नाही. कारण, कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसनी न घेणं हा त्यांचा अपमान असतो, असं पंकजा म्हणाल्या.

शिंदे आणि फडणवीस यांच्या नावावर आणखी एक विक्रम : समित्यांचे उदंड पीक 

गेल्या काही दिवसांपासून त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू रंगली होती. त्याला कारणही तसेच होते. 2019 मध्ये पंकजा मुंडे यांनी परळीतील पराभवासाठी विरोधी उमेदवाराला खुराक पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्री करण्यात आल्याने पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

त्यातच आता भारत राष्ट्र समितीने पंकजांपुढे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. आणि आज या प्रस्तावासंदर्बात त्यांनी त्यांनी लक्षवेधी विधान केलं. त्यामुळं भाजपच्या गोटात खळबळ माजली. दरम्यान, आता पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकून बीआरएसमध्ये प्रवेश करणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube