Download App

सांगलीत भीषण अपघात; कॅनॉलमध्ये कार कोसळली, तीन चिमुकल्यांसह सहा जण ठार

सांगली जिल्ह्यात ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे.

Image Credit: Letsupp

Sangli accident : सांगली जिल्ह्यातून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुलीचा वाढदिवस करुन परतणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातलाय. कार कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात (Accident) तासगावच्या अभियंता असलेल्या राजेंद्र पाटील यांच्यासह सहा जाणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे. ही घटना तासगाव मणेराजुरी मार्गावर चिंचणीजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Pune Car Accident : चौकशीचा फास जवळ येताच ससूनचा ; कर्मचारी फरार

महिला गंभीर जखमी

ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये जोरात आदळली. यामध्ये कारला जबर धक्का बसल्याने कारमधील सहा जण जागीच मृत्यू पावले. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जातं आहे.

मृतांमध्ये तीन लहान बालक

अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला. चालकाला झोप आलेली असावी आणि त्यामधून कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश आहे.

परिसरात हळहळ

अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलं. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनेतील सहा मृत एक जखमी

follow us

वेब स्टोरीज