Download App

गुरुनाथ कटारे खून प्रकरण : माजी आमदारपुत्राचे तब्बल आठ वर्षांनी दर्शन; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Solapur Crime : अक्कलकोटचे भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (sidramappa-patil) यांचा मुलगा रमेश पाटील याला पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो फरार होता. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी (Police custody)सुनावली आहे. 2014 मध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे (gurunath-katare)यांचा रात्रीच्यावेळी मार्चला मिलजवळ निर्घृन खून करण्यात आला होता. तर त्यांचे सहकारी नबीलाल शेख यांच्यावरही प्राणघातक हल्ला करुन जखमी केले होते. (Solapur gurunath-katare-murder-case-former-bjp-mla-sidramappa-patil-son-ramesh-patil-arrested)

Biparjoy Cyclone अगोदर भारताला धडकली ‘ही’ 5 मोठी चक्रीवादळं; अनेकांचा घेतला जीव!

या गुन्ह्यामध्ये अक्कलकोटचे भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा मुलगा रमेश सिद्रामप्पा पाटील, प्रमोद स्वामी, जगदीश कोन्हेरीकर, प्रदीप मठपती यांनी कट रचून खून केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

यामधील आरोपी प्रमोद स्वामी, जगदीश कोन्हेरीकर, प्रदीप मठपती यांना अटक करण्यात आली होती. मात्र रमेश पाटील हा राजकीय फायदा मिळवीत फरार झाला होता. अटकेतील स्वामी, कोन्हेरीकर, मठपती यांच्यावर गुन्हे अन्वेशण विभाग पुणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यात तिघेही निर्दोष सुटले.

एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघासात ऋषभ पंत करणार पुनरागमन?

रमेश पाटील यास उच्च न्यायालयात अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर करून अक्कलकोट येथील न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे कटारे खून खटल्यातील मुख्य संशयित आरोपी रमेश पाटील हा बुधवार, 7 जून रोजी अक्कलकोट येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेख यांच्या न्यायालयात शरण आला.

या गुन्ह्यातील काही गोष्टी आरोपीकडून माहिती करुन घ्यायच्या आहेत. शिवाय या गुन्ह्याचा कट कसा रचण्यात आला आणि सुपारीची रक्कम रोख स्वरुपात की बँकेमार्फत दिली, याचा तपास करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयित आरोपीला पोलीस कोठडी सुनावली होती.

8 जून रोजी पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअक्षीक्षक सस्ते यांनी रमेश पाटील यास चौकशीसाठी पोलीस कोठडीची विनंती केली होती. न्यायालयाने 12 जूनपर्यंत रमेश पाटीलला पोलीस कोठडी सुनावली होती. सरकारतर्फे अॅड. गिरीष सरवदे तर आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.

Tags

follow us