Download App

माझ्या घरावर तेराच पत्रे, आता ते काढून नेता? ‘एसआटी’वरुन मनोज जरांगेंचा खोचक सवाल

Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी एसआयटी (SIT)चौकशीवरुन सरकारवर (State Govt)जोरदार निशाणा साधला आहे. एसआयटी चौकशीला आपण अजिबात घाबरत नाही. कारण आपण कोणाचाही एक रुपया देखील खाल्लेला नाही. माझं पाकिट जर कुणी चोरानं मारलं तर चोरालाच टेन्शन येईल, त्याला वाटल की, आज सगळ्यात भंगार गिऱ्हाईक मिळालं. एसआयटी चौकशीवर आता माझ्या घरावर तेराच पत्रे आहेत, आता ते पण काढून नेता का? असा खोचक सवाल मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना विचारला आहे. मनोज जरांगे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी वैरागमध्ये आयोजित सभेत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार निशाणा साधला.

‘मी घरात बसून आदेश देणारा नाही तर फिल्डवरचा CM’; शिंदेंची ठाकरेंवर जहरी टीका

मनोज जरांगे म्हणाले की, मी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो, तेव्हा सरकारने माझ्यावर एसआयटी नेमली आहे. आता ती नेमकी काय असती त्याचा मला काही मेळ लागत नाही. बरं नेमली एसआयटी तर मी खाल्लेलं तरी तितकं पाहिजे मग तरी नेमायची. आता फडणवीससाहेब आता माझ्या घरावर तर तेराच पत्रे आहेत, मग काय ते पण काढून नेता? अन् तुमच्या घरावर टाकता का? तुमच्या डोक्यावर काही परिणाम झाला का? असाही सवाल उपस्थित केला.

…तर आपणाला कधीच माफ करणार नाही, आव्हाडांचे प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र

तुम्ही एसआयटी कोणावर नेमायला पाहिजे? तुमच्या अवतीभवती जे भ्रष्टाचारी हिंडतेत त्यांना. यांच्याभोवती ज्याप्रमाणं सुगंधी अगबत्त्या असतात, त्याप्रमाणं चहुबाजूने भ्रष्टाचारी हिंडत आहेत. यावरून काय साध्य होणार? जे राज्यातील भ्रष्टाचारी नेते आहेत, त्यांची तुम्ही चौकशी करा. एसआयटी चौकशी आपल्यावर लावली, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे जेव्हा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो, त्यावेळी आपल्यावर एसआयटी नेमली. तेव्हा म्हटलं की, नेमा कारण आपल्या पाठिमागं कोणीच नाही. आपण कोणाचा एक रुपया घेतलेला नाही. आपलं पाकिट हाणलं तर चोरालाच टेन्शन येतं, असंही यावेळी मनोज जरांगे म्हणाले.

follow us