Manoj Jarange : “मला अटक तर करू द्या, लाट काय असते ते कळेल”; जरांगेंचा रोखठोक इशारा

Manoj Jarange : “मला अटक तर करू द्या, लाट काय असते ते कळेल”; जरांगेंचा रोखठोक इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेल , ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यावधी लोक रस्त्यावर दिसतील. लाट काय असते ते कळेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्य सरकारला रोखठोक इशारा दिला.

मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही 

मी सगेसोयरेपासून मागे हटणार नाही. ओबीसी आरक्षणात जायचे असेल तर 27 तक्के जात मागास असावी लागते. ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे तर ती मागास असावी लागते आणि ते सिद्ध झाले आहे. मराठा समाज आता मागास सिद्ध झाला आहे. आता 10 टक्के आरक्षण ओबीसी आरक्षणामध्ये घ्या. मी 10 टक्के आरक्षण स्वीकारावे म्हनून तुम्ही माझ्या मागे चौकशा लावल्या आहेत. आमच्या मुलांना केंद्रात सवलती मिळाल्या पाहिजेत. माझा लढा फक्त मराठा समाजासाठी आहे. मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही.

‘बनावट सही, शिक्के प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही’; अजित पवारांची तंबी

सगेसोयरे अधिसूचनेची अंबलबजवणी करा, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. समाजाच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय हटत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. फडणवीस मला जोपर्यंत अटकवणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार. तुमची गुंतवायचे तयारी आहे याची मी आनंदाने वाट बघत आहे. मला बोलायला लावू नका. मराठ्यांच्या लेकरांसाठी मी लढतो आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

राजकारण माझा मार्ग नाही

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून सर्वमान्य उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरवावं असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने ठेवला होता. यावर विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, सध्या माझा पूर्ण लक्ष आरक्षणाकडे आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही. मराठ्यांचे मुले मोठे झाले पाहिजे त्यासाठी माझी झुंज सुरू आहे. समाज माझ्यासाठी मोठा आहे, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर उत्तर दिलं.

महायुतीचे 13 शिलेदार ठरले : मुंबईतील चार अन् जळगाव, रावेर मतदारसंघात धक्कादायक नावे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज