Solapur News : नांदेडमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंज मळाळे यांनी त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या नांदेड येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसले तरी कामाच्या ताणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे खरे कारण तपासातूनच समोर येईल.
Asian Games : भारताने रचला इतिहास! 25 गोल्डसह 100 पदके पटकावली; वाचा यादी
मळाळे यांनी आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहिली होती. ही चिठ्ठी आता सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आपण आत्महत्या का करत आहोत याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. प्रशासनाच्यावतीने कुटुंबाला वेळेवर मदत मिळावी यांसह अनेक गोष्टींचा त्यांनी या चिठ्ठीत उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे या चिठ्ठीत लिहिल्याची माहिती आहे.
मळाळे हे आजारी असल्याने काही दिवसांपासून रजेवर होते. सोलापुरातील कुमठा नाका येथील सम्राट चौकातील स्वतःच्या घरी आले होते. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील अंगणात गेले आणि त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधूवन डोक्यात गोळी झाडली. मोठा आवाज आल्याने त्यांच्या पत्नीने बाहेर येऊन पाहिले तर त्यांना मळाळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या घटनेने परिसरातही मोठी खळबळ उडाली आहे.
चोरीसाठी घरात शिरला, अन् गळा आवळून केली हत्या; भाडेकरूनेच मालकिणीला संपवलं…
संबंधित अधिकाऱ्याचा एक ते दीड महिन्यापूर्वी अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. नांदेडला ते अॅडमिटही होते, अशी माहिती मिळत आहे. मळाळे हे सध्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते मूळचे उस्मानाबादचे असून सोलापूर येथे वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. यानंतर त्यांची नांदेड येथे पदोन्नतीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर बदली झाली होती. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली का, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.