मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरात वादाच्या घटनांचे सत्र अद्यापही सुरुच आहेत. माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा इथं एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती तयार झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
IPS Transfer : शिंदे फडणवीसांनी IG, DIG अन् SP बदलले
अहमदनगरच्या वाडिया पार्क परिसरांत छत्रपती शिवराय केसरी स्पर्धा सुरु असतानाच दोन तरुणांमध्ये वाद झाला. या वादावेळी जमावाकडून घोषणाही देण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. या घटनेचे आज माळीवाडा परिसरात पडसाद उमटले आहेत.
मोहम्मद सिराजने रागाच्या भरात केली शिवीगाळ, ‘त्यानंतर घडले असे कृत्य की…’
कालच्या घटनेनंतर माळीवाडा परिसरांत एका तरुणाला मारहाण झालीय. या वादानंतर बारातोटी परिसरांत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वादादरम्यान, दगडफेक घडली असल्याचंही समजतंय. हा वाद नेमका कशावरुन झालाय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसून कालच्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या वादाचे पडसाद उमटल्याची सर्वत्र चर्चा आहे.
Pune News : अश्लील रॅप साँगवरून वातावरण तापलं; ABVP कडून विद्यापीठात तोडफोड आंदोलन
या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी धाव घेत तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. वादाच्या घटना घडल्यानंतर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलं आहे. या प्रकरणी अद्याप कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा नगरमध्ये वातावरण अशांत झालं आहे. नगर शहरात अशांततेच वातावरण निर्माण झालं असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र काही संघटनांकडून सुरु असल्याचं शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आरोप केला.