Pune News : अश्लील रॅप साँगवरून वातावरण तापलं; ABVP कडून विद्यापीठात तोडफोड आंदोलन

  • Written By: Published:
Pune News : अश्लील रॅप साँगवरून वातावरण तापलं; ABVP कडून विद्यापीठात तोडफोड आंदोलन

ABVP Protest In SPPU :  पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात अश्लील रॅप साँगच्या चित्रीकरणावरून प्रशासनाला जाब विचारला. तसेच यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मुख्य सभेत जाऊन आंदोलन करत तोडफोड केली व निवेदन कुलगुरू यांच्या अंगावरती भिरकवली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील भाषेत केलेले रॅप साँग चे शूटिंग झाली कशी याची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या आम्ही ऐकून घेतले आहेत एक समिती नेमली आहे समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती कुलगुरू कारभारी काळे यांनी दिली.

Video : मविआ फुटणार! पवारांच्या विधानाला महत्त्व अन् गांभीर्य; CM शिंदेंचं सूचक विधान

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचे न झालेले पदवी ग्रहण सोहळा व डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रवेश प्रलंबित आहे ते लवकरात लवकर देण्यात यावे. परीक्षांचे प्रलंबित निकाल व लागलेल्या निकालांमध्ये चुका झालेल्या आहेत. स्पोर्ट स्टेडियमचे उद्घाटन होऊनदेखील विद्यार्थ्यांना वापरण्यास बंदी बंदी आहे ते करण्यात यावं. BScBEd च्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेचा १०० टक्के लाभ न देणे आदी मुद्दे यावेळी आंदोलकांनी उपस्थित केले. तर, दुसरीकडे आम्ही कुठलीही तोडफोड केली नाही यापूर्वी आम्ही विद्यापीठातुलगुरूंना निवेदनही दिलं होतं. विद्यापीठात कुठल्या गोष्टीला परवानगी घ्यावी लागते मात्र ही परवानगी दिली कोणी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता असंघटीत कामगारांच्या आत्महत्येतही वाढ, महाराष्ट्रात 5270 जणांनी घेतला फास

नेमकं काय घडलं?

पुणे विद्यापीठात आज विद्यापीठ व्यवस्थापनाची बैठक सुरू होती. या बैठकीला सिनेटचे सदस्यही उपस्थित होते. त्यावेळी अचानक ABVP चे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आत शिरले. यावेळी कोणत्याही प्रकारची चर्चा न करत आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, यावेळी अश्लील रॅप साँगचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्यावरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार?

दरम्यान, या सर्व गोंधळावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडी च्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube