Video : मविआ फुटणार! पवारांच्या विधानाला महत्त्व अन् गांभीर्य; CM शिंदेंचं सूचक विधान

  • Written By: Published:
Video : मविआ फुटणार! पवारांच्या विधानाला महत्त्व अन् गांभीर्य; CM शिंदेंचं सूचक विधान

CM Shinde Reaction On Sharad Pawar Statement ON MVA Alliance : शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली आहे. पवारांच्या विधानानंतर राज्यात आगामी काळात राजकीय समीकरणं बदललेले दिसू शकतात अशा चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत. पवारांच्या विधानानंतर अनेक नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंनी दिलेली प्रतिक्रिया ही अतिशय सूचक अशी आहे.

राजकीय गणितं बदलणार; शरद पवारांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

शिंदे म्हणाले की, पवार हे मोठे अनुभवी नेते आहेत. ते जेव्हा काही वक्तव्य करतात त्याला काहीतरी महत्त्व असतं आणि गांभीर्य असतं असे शिंदेंनी म्हटले आहे. यावेळी शिंदेंनी काल पाचोऱ्यात झालेल्या ठाकरे गटाच्या सभेतील मोदींवर करण्यात आलेल्या विधानावरून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मोदींनी केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांचे नेतृत्त्व सिद्ध केलेले आहे. त्यांच्याबाबत अशाप्रकारे एकेरी उल्लेख करणे अतिशय दुर्देंवी आहे. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार असे शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच G20 चे अध्यक्ष पद मिळाले. त्यांच्या मातोश्रींचे निधन झालं त्यानंतर लगेच त्यांनी जनतेच्या सेवेमध्ये सहभागी झाले यामधूनच देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यात आलेली आहे. कालचं वक्तव्य हे देशातून केलेल्या वक्तव्य तसेच पोट दुखीमुळे केले जात आहे. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले त्यांच्या काय अपेक्षा करु शकतो हे काल उध्दव ठाकरे यांनी सिध्द करुन दाखवलं. उध्दव ठाकरे यांनी जे वक्तव्य केले ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. बाळासाहेबांनी कधीही विरोधी पक्षातील माणूस असेल तरीही त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करत नसे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा सध्या सुरू आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात जोडत भाष्य टाळले.

“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर

काँग्रेसची भूमिका काय?

दरम्यान, पवारांच्या विधानानंतर आता काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,  काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, भाजप विरोधी राजकीय दलांना सोबत घेऊन एकत्रित लढण्याची भुमिका कॉंग्रेसची आहे. युतीमध्ये असणाऱ्यांची भूमिका वेगवेगळी असू शकते. लोकशाही धोक्यात आली आहे, शेतकरी उद्धवस्त झाला आहे. महागाई मुळे शेतकरी परेशान आहे, जे सोबत राहतील त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे चालत राहू. कोणाचा मनात काय हा आमचा प्रश्न नाही, काँग्रेसने महासत्ता बनवण्याचं काम केले. काँगेसचे 60 वर्षात जे उभं केलं ते भाजप विकून सरकार चालवत आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे.
महाराष्ट्रात जी काही सध्या अस्थिरता आहे त्या आधारावर छगन भुजबळ बोलले असतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे अपेक्षित आहे, त्या आधारावर महाराष्ट्रात काहीही होऊ शकते अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

काय म्हणाले राऊत? 

राऊत म्हणाले की, अनेकदा पवारांच्या बोलण्याचा, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. आत्ता या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेत आहोत… तर आम्ही अद्याप एकत्र आहोत हे लोकांना सांगण्यासाठी. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होणार आहे. त्या सभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते हजर राहतील, असं राऊत म्हणाले.

ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा मोठा वाटा आहे. आम्ही सगळे आहोतच. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेतच. पण शरद पवारांचं महत्व यात फार आहे. ते महत्व कायम राहणार आहे. त्यांची भूमिका आहे की, महाविकास आघातील तीनही पक्ष एकत्र राहिले, तर 2024 च्या निवडणुकीत आपण भाजपचा पराभव करू शकू, लोकसभेतही भाजपला धोबीपछाड करू. त्यामुळं महाविकास आघाडीच्या संदर्भात पवारांची एकत्र न लढण्याची भूमिका असेल, असं मला वाटतं नाही. आम्ही सगळेच सातत्याने त्यांचाशी चर्चा करत असतो. आत्ताही मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्या बोलण्यावरून महाविकास आघाडी तुटावी, असं मला वाटत नाही, असं राऊतांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube