Download App

विखेंना धोबीपछाड दिलेल्या ‘गणेश’मध्ये अध्यक्षपदी लहारे, तर उपाध्यक्षपदी दंडवते

  • Written By: Last Updated:

Ganesh Cooperative Sugar Factory : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा होम ग्राऊंड असलेल्या असलेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या (Ganesh Cooperative Sugar Factory) निवडणुकीत थोरात-कोल्हे आघाडीने बाजी मारली होती. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी 19 पैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, आज श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुधीर वसंतराव लहारे (Sudhir Vasantrao Lahare) यांची तर उपाध्यक्षपदी विजय भानुदास दंडवते (Vijay Dandawate) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Sudhir Lahare as president of Ganesh Karkhana, Vijay Dandavate as vice president)

 

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वातावरण गेल्या महिनाभरापासून तापले होते. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात हे या निवडणुकीत आमने – सामने आले होते. या निवडणुकीत विखे आणि थोरात या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्योरोप झाले होते. अखेर जिल्हा बॅंकेचं संचालक विवेक कोल्हे आणि थोरात यांच्या गटाने विखेंना पराभवाचा धक्का देत त्यांच्या ताब्यातून कारखाना काढून घेतला. या निवडणुकीत विखे-पाटील यांच्या जनसेवा मंडळ पॅनलचा दारूण पराभव झाला होता तर थोरात-कोल्हे गटाने 19 पैकी 18 जागा जिंकल्या.

हा तर मुख्यमंत्री शिंदेंचा बालिशपणा, सुरक्षेत कपात अन् शाखेच्या कारवाईवर आदित्य ठाकरे कडाडले… 

दरम्यान, प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 12 वाजता नवीन संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सुधीर वसंतराव लहारे व विजय भानुदास दंडवते यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बाळासाहेब थोरात, माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या. नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल थोरात यांनी नवनिर्वाचि अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून सभासद शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करून कारखान्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा थोरातांनी दिल्या.

याप्रसंगी शिवाजीराव कोते, गंगाधरनाना चौधरी, डॉ. एकनाथ गोंदकर, धनंजय जाधव, शिवाजीराव लहारे, सुधीर म्हस्के, विठ्ठलराव शेळके, संजय शेळके, चंद्रभान धनवटे, चंद्रभान गुंजाळ,भागवत चोळके, आदींसह सर्व संचालक, गणेश परिसरातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us