Download App

Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe Said Opponents tried to confuse me in Lok Sabha elections : सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पारनेर तालुका बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) या दोन मातब्बर विरोधकांनी आपसात समेट घडविला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, आता खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकसभा निवडणूकीतही माझी कोंडी झाल्याचा प्रयत्न झाला. पण, मोठ्या मताधिक्यांनी निवडूण आलो, असं सांगत पारनेर तालुका बाजार समितीची निवडणुकीतही विखे गटच बाजी मारेल, असा इशारा दिला.

भाजप व विखे गटाच्या बरोबर सभा गाजवत फिरणारे औटीनी मोर्चा बदलल्याने तालुक्यात भाजपची सर्व मदार विखे गटावर आली आहे. अशा स्थितीत आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील पारनेर दौऱ्यावर आले होते. पारनेरमध्ये आयोजित जनसेवा पॅलनच्या प्रचार बोलतांना विखेंनी विरोधक असलेले आ. निलेश लंके आणि विजय ओटी यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, लंके आणि औटी एकत्र आल्यानं माझी कोंडी झाली. कोंडी करण्याचा प्रयत्न आज होतो आहे, असं नाही. तर 50 वर्ष लोकांनी आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमान आणि स्वकर्तृत्वावर गेली 50 वर्ष नगर जिल्ह्याच्या विकासाठी आणि नगर जिल्ह्याला दिशा देण्याचं जे काम विखे कुटूंबाने केलं, त्याच हिमतीवर आपण लढत आहोत. पण आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं टोला लगावला.

Shah Rukh Khan : किंग खानला दिलासा; ‘या’ सिनेमातील लीक क्लिप्स हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ते म्हणाले, हे सोडा लोकसभा निवडणूकीतही यांच्या नेत्यांनी माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण ठाण मांडून 3 लाखांनी निवडून आलो, हा सुजय विखे आहे, असं सांगत बाजार समितीची निडणुकीतही आपला गट विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विखे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपली शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन बांधली. अन् आता विजय औटींनी देखील पारनेर शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते, त्यांना आता लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे, अशा शब्दात विखेंनी औटींना डिवचलं. दरम्यान, आता यावर विजय औटी नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us