साताराः पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकारविरोधात राळ उठविली होती. थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर शिंदे गटाचे मंत्री यांच्याविरोधात सुषमा अंधारे यांनी आवाज उठविला होता. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), शंभूराज देसाईवर (Shamburaj Desai) सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केले होते. हे आरोप दोन्ही मंत्र्यांना फेटाळून लावले आहेत. आता मात्र सुषमा अंधारे या अडचणीत येऊ लागल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्याविरोधात मंत्री भुसे समर्थकाने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून 500 कोटींचं कोकेन जप्त; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई
अंधारे यांचे समर्थक धनाजी भिसे यांनी अंधारेंविरोधात साताऱ्यातील पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी तक्रार आहे. हा कार्यकर्ता एकटाच तक्रार देण्यासाठी गेला नाही. त्याच्याबरोबर आणखी काही समर्थकही होते.
मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या शासकीय जाहिरातीवर चव्हाणांचा सवाल
दोन दिवसांपूर्वीच देसाईंची अंधारेंना नोटीस
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपावर शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी माझ्यावर केलेले आरोप मागे घ्यावेत, असे देसाई म्हणाले होते. परंतु सुषमा अंधारे या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्याने त्यांचे विधान मागे घेतले नाहीत. त्यामुळे मंत्री देसाई यांनी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आता अंधारेंविरुद्ध कार्यकर्त्यांनी थेट तक्रार दाखल केली आहे.
सुषमा अंधारे यांनी मंत्री भुसे व देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामध्ये मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप अंधारेंचा होता. या मंत्र्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीच अंधारेंची होती. अंधारेंना दोन्ही मंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रियाच सुरू झाली आहे. यावर अद्याप तरी सुषमा अंधारे किंवा ठाकरे गटाकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही.