अहमदनगर : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान शिक्षक संघटनेच्या (Information Technology Teachers Association) मागम्या मान्य न केल्यास फेब्रुवारी – मार्चमध्ये तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील (Atul Patil) यांनी दिला आहे.
इयत्ता बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांना शिकवला जातो. या विषयाची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन पध्दतीने घेतली जाते. ही परीक्षा दि. २३, २४ व २५ मार्च २०२३ रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक हे तांत्रिक सहाय्यक अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात. अशा अत्यंत महत्वाच्या विषयाबाबत शासनाने अनुकूल भूमिका घेऊनही निर्णय होत नाही. माहिती व तंत्रज्ञान विषय शिक्षक गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या हक्काचे वेतन प्राप्त करण्यासाठी झटत आहेत.
उच्च माध्यमिक स्तरावरील माहिती-तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतनापोटी अनुदानाची तरतूद करण्याबाबत शासनाची माहिती संकलन पक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार राज्यात ५९७ शिक्षक २१ वर्षापासून सेवेत आहेत. त्यांच्या वेतनापोटी सुमारे १० कोटी खर्च येणार आहे. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे, त्यांची सन २००१-०२ पासूनची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, आदी मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा मार्चमध्ये होणाऱ्या १२ वी ञ परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा संघटनेने इशारा दिला आहे.
गृहमंत्रीचं आक्रमक.., सुप्रिया सुळेंनी घेतला फडणवीसांचा समाचार
राज्यातील सर्व ९ विभागांतीलर अंदाजे २ हजार पेक्षा अधिक माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षा देतांना असुविधेचा सामना करावा लागेल. यास सर्वस्वी शिक्षक विभागव सरकार जबाबदार असेल, असे संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, विशाल शिंदे, नितीन राऊळवार, नंदू जाधव, संजय पवार, प्रशांत भावसार व पदाधिकारी यांनी दिला आहे.