Download App

औद्योगिक क्षेत्रावरुन शिंदे-पवारांची जुंपली, पवारांकडून शिंदेंचा ‘अदृश्य शक्ती’ असा उल्लेख…

महाविकास आघाडीला म्हणूनच कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेल्या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना काढत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यावर नाव न घेता केला आहे. आरोप करताना रोहित पवारांनी राम शिंदेंचा अदृश्य शक्ती असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे-पवारांमध्ये जुंपणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवकांसाठी मंजूर केलेल्या औद्योगिक क्षेत्राला मंजूरी मिळालेली असून अद्याप या भागातील युवकांसाठी औद्योगिक क्षेत्रासाठी उद्योग आणले जाणार असल्याचं आश्वासित करण्यात आलं होतं, परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने मतदारसंघातील अदृश्य शक्तीच MIDC ची अधिसूचना काढू देत नसल्याचं रोहित पवारांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलंय. दरम्यान, येत्या 26 जूनपर्यंत अर्थात छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीदिनापर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदनच राज्याच्या प्रधान सचिवांना देण्यात आलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच येणार नवीन फीचर; फॅमिली अन् ऑफिस ग्रुपचे काम होणार सोपे

औद्योगिक क्षेत्राच्या अधिसूचनेचं खापर रोहित पवार यांनी राम शिंदेंवर फोडलं असून पवार पोस्टमध्ये म्हणाले, “सगळा स्वयंपाक तयार आहे… जेवणाऱ्यांनाही कडकडून भूक लागलीय.. सर्वजण वाढण्याची वाट पाहतायेत.. पण जेवण रुचकर, स्वादिष्ट आणि चविष्ट झाल्याचं संपूर्ण श्रेय आचाऱ्याला जाईल म्हणून कुणालाही जेवायला वाढू दिलं जात नाही…अशी अवस्था माझ्या मतदारसंघातील #MIDC ची झालीय”.

‘यांना आपल्या पोराबाळांची चिंता’; विरोधकांच्या बैठकीवर बावनकुळेंचा निशाणा

“केवळ मला आणि मविआ सरकारला श्रेय जाईल म्हणून मतदारसंघातीलच काही अदृश्य शक्ती मंजूर झालेल्या #MIDC ची अधिसूचना काढू देत नाहीत.. पण यामुळं माझ्या मतदारसंघातील युवांचं अतोनात नुकसान होतंय हे फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या त्या अदृश्य शक्तीच्या व्हिजन नसलेल्या नेत्याला कसं कळत नसेल? पण माझ्या मतदारसंघातील युवांसाठी मी लढणार आणि जिंकणार” असं रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेस जिंकणारच; विरोधकांच्या बैठकीआधीच राहुल गांधींचा एल्गार

दरम्यान, मौजे पोटेगाव खंडाळामध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली असून अधिवेशनामध्येही या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट सचिवांना पत्राद्वारे शाहु महाराजांच्या जयंतीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. कुठलीही कारवाई न झाल्यास थेट उद्योमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाला बसणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांवरुन शिंंदे-पवार यांच्यातील शाब्दिक चकमक राज्याला नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या बाजार समितीच्या राम शिंदेंनी मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार पाडून आपलं वर्चस्व दाखवलं होतं. त्यावरुनही दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्योराप झाल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर राम शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us