‘यांना आपल्या पोराबाळांची चिंता’; विरोधकांच्या बैठकीवर बावनकुळेंचा निशाणा

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 23T115120.554

Chandrashekhar Bawankule :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, सध्या सगळीकडे या दौऱ्याची बारकाईने दखल घेतली जात असून, जगभरातील अनेक देश या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत. तर दुसरीकडे बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. यासाठी राज्यातूनही नेतेमंडळी पाटना येथे दाखल झाली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत. मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आलेत. एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत. पण देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं आता २०२४ मध्येही जनता मोदीजींची साथ देणार आहे, असे म्हणत बावनकुळेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

पुढची विठ्ठलाची महापूजा अजितदादा करतील; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर मिटकरींचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण

दरम्यान,  लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच देशातील प्रमुख विरोधी पक्ष कामाला लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होत आहे. एकूण 23 विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमाhttps://letsupp.com/politics/amol-mitkari-said-ajit-pawar-will-do-mahapooja-of-viththal-as-cm-of-maharashtra-60348.htmlर यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लागलं आहे.

या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध नेते उपस्थित झाले आहेत. हे नेते पाटणा विमानतळावर आल्यावर स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विमानतळावर येऊन त्यांचं स्वागत केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube