कर्जत : शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पक्ष प्रवेश सोहळा आणि शेतकरी मेळाव्यासाठी कर्जत (Karjat) शहरात उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्या या दौऱ्याची कर्जतमध्ये जंगी तयारी करण्यात आली असून चौकाचौकात त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेत. राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार (NCP’s A. Rohit Pawar) यांच्याकडून देखील फडणवीस यांच्यासाठी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने राष्ट्रवादीचा फलक खाली उतरवला. त्यामुळे कर्जतमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी देवेंद्र फडणवीस हे कर्जत दौऱ्यावर असणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत मतदार संघात आहेत. रोहित पवारा यांनी या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे. मात्र, आता हाच बालेकिल्ला पुन्हा खेचून आणण्यासाठी फडणवीस यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातो. फडणवीस यांच्या या दौऱ्याची कर्जमध्ये जंगी तयार करण्यात आली. जागोजागी भाजपकडून स्वागताचे फलक लावण्यात आले. कर्जतमध्ये आज जिल्ह्यातील अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे या मेळाव्याविषयी सामान्यांच्या मनात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले हे देखील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस, आ. राम शिंदे यांच्यासह भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि प्रवीण घुले मित्रमंडळाच्यावतीने हेलिपॅड परिसर, सभास्थळी शुभेच्छा फ्लेक्स लावण्यात आले होते.
आता आंब्यांची खरी चव चाखायला मिळणार! FSSAI कडून नवीन आदेश जारी
महत्वाचं म्हणजे, या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँगेसकडून देखील फडणवीस यांच्यासाठी पक्षाचे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. राष्ट्रवादीने लावलेला फलक हा भाजपने लावलेल्या फलकासमोरच लावला असल्याने हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून होता. प्रत्येकाच्या तोंडी फक्त राष्ट्रवादीच्याच फकलकाची चर्चा होती. या फलकावरील मजकूर देखील लक्ष वेधून घेणार होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्जत-जामखेडमध्ये हार्दिक स्वागत, असा हा मजकूर होता. त्यामुळे कार्यक्रम जरी भाजपचा असला तरी चर्चा मात्र, राष्ट्रवादीच्याच फलकाची होती. राष्ट्रवादीने लावलेल्या फलकामुळे सकाळी काही काळ या भागातील वातावरण बदलून गेले होते. प्रथमताच कोणी मोठा पदाधिकारी येत असताना दोन पक्षाचे फलक युद्ध कर्जतकरांना पहावयास मिळाले. मात्र शेवटी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे प्रशासनाचे कर्तव्य असल्यानं प्रशासनाने राष्ट्रवादीचे ते फलक खाली उतरवले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, या फलक युद्धाची काही काळ झलक कर्जतकरांनी अनुभवली असून असे भाजपकडून असे राजकारण होणं योग्य आहे का? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.