Download App

धमक्या अन् दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, थोरातांचा विखेंना अल्टिमेटम

अहमदनगर : बाळासाहेब थोरात आणि विखे वाद जिल्ह्याला काही नवीन नाही. अशातच आता बाळासाहेब थोरातांनी विखेंना एक अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे विखे-थोरातांचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बाळासाहेब थोरातांनी थेट पत्रकार परिषदेतच हा अल्टिमेटम दिल्याने पुन्हा एकदा थोरात-विखे वादाच्या चर्चा रंगल्या आहेत.

संगमनेर तालुक्यात धमक्या आणि दादागिरी चालणार नसल्याचा अल्टिमेटम काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटलांना दिला आहे. तसेच तुमच्या दडपशाहीचे झाकण उडवायला आम्हाला वेळ लागणार नसल्याचा इशाराही थोरातांनी दिला आहे.

पुढे बोलताना थोरात म्हणाले, अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. आपल्या राजकीय सुडापोटी जिल्ह्यातील विकासकामे आणि जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

‘सत्यापुढे अधिक शहाणपण चालत नाही, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका

‘लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक आमदाराला काही अधिकार दिलेले आहेत. नगर जिल्ह्यात विद्यमान पालक मंत्र्यांकडून या अधिकारांची पायमल्ली केली जाते आहे. लोकप्रतिनिधीला न कळवता परस्पर बैठका घेतल्या जात आहेत, आपल्या चेल्याचपाट्यांना हाताशी धरून अधिकारी आणि कंत्राटदारांना धमकावले जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

संगमनेर तालुक्याची रचना, येथील राजकारण आणि कामांची पद्धती संपूर्ण राज्याला माहित आहे. ज्यांना स्वतःच्या तालुक्यातले मुख्य रस्ते धड करता आले नाही, हे संगमनेरला येऊन बैठका घेतात आणि कामे बंद पाडतात हे हास्यास्पद असल्याचं ते म्हणालेत.

सोनाली कुलकर्णीनं का मागितली माफी? सोशल मीडियावर ट्रोल

पूर्वीपासूनच संगमनेर तालुक्याचा विकास त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे या विकासाला गालबोट कसे लावता येईल किंवा हा विकास कसा थांबवता येईल हा कालच्या बैठकीचा प्राधान्यक्रम होता. जबाबदार मंत्री आणि नगर जिल्ह्यासारख्या सुजाण जिल्ह्याचे पालकमंत्री सांभाळणाऱ्या व्यक्तीने निदान बैठका घेताना आपल्या पदाचा तरी आब राखाव, असा सल्लाही थोरातांनी यावेळी दिला आहे.

तसेच मी 1985 पासून सक्रिय राजकारणात आहे, आजवर मी अनेक पालकमंत्री बघितले. मात्र पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही कामाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करायचे नाही असा अजब फतवा काढणारे हे राज्यातले पहिलेच पालकमंत्री असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

जलील औरंगाबादमध्ये जन्मले, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मरतील, राजा सिंह ठाकुरांचा जालीलांना टोला

शिवाय 2019 ते 2022 या काळात मंजूर झालेल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा स्वतःचे फोटो लावा असे सांगणारा पालकमंत्री ही मी पहिल्यांदाच बघतो आहे. एकीकडे विकासकामे बंद करायचे आणि दुसरीकडे गावोगाव विकासकामांचा बोर्ड लावून प्रचार करायचा. हे पालकमंत्र्यांचे धोरण आहे की सरकारचे याची स्पष्टता होणे गरजेचे असल्याचंही ते म्हणालेत.

दरम्यान, माझ्या मते हे जाणीवपूर्वक केले जात आहे, काही ठराविक तालुक्यांमध्ये हे प्रकार सुरू आहेत. यामुळे अनेक कामे बंद पडलेली आहेत. आमदार हा समन्वय समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो शिवाय अधिकारी आणि आमदार यांच्या चर्चेतून तालुक्याच्या विकासासाठी अभिप्रेत असणाऱ्या कामांची प्राधान्यक्रमानुसार यादी ठरविली जाते. त्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेलाच सुरुंग लावण्याचे काम पालकमंत्र्यांकडुन केला जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी पाच वर्षांचा एक दृष्टिकोन समोर ठेवलेला असतो त्या व्हिजनलाच मंत्री सुरुंग लावत आहेत असे दिसते. नगर जिल्ह्याच्या विकास कामांना गालबोट लावणाऱ्या पालकमंत्र्यांच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us