‘सत्यापुढे अधिक शहाणपण चालत नाही, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका

‘सत्यापुढे अधिक शहाणपण चालत नाही, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका

नांदेड : आम्ही लोकांवर टीका टिप्पनी करण्यात वेळ घालत नाही, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आम्ही करतोय. रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता. आता वाघ कसा पाळला जाणार ? कुत्री- मांजरं पाळली जात असतात. वाघ पाळला जात नाही. (Maharashtra Politics) वाघ स्वतंत्र असतो. त्याचा स्वतंत्र बाणा असतो. रामदास कदमांना देणाऱ्यानं स्क्रीप्ट दिली. पण त्यांनी ती वाचूनही बघितली नाही. त्यांना त्या शब्दांचे अर्थही कळले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे वाघ मुळूमुळू कधीच रडत नसतो”, असं यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare ) म्हणाल्या.

ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि हजारो ट्रॉलर्स एवढा सगळा रोज मारा होतोय. तरी देखील न खचता, न डगमगता मा. उद्धव साहेब आणि मा.युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आपले काम चालू ठेवून. जंग पछाडण्याचं काम करत आहेत आणि ते असंच पुढेही काम करत राहतील. दरम्यान, यासंदर्भात सुषमा अंधारेंनी नांदेडमध्ये बोलताना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील.’मी गद्दार नाही, खुद्दार आहे’ असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे. गेल्या १० वर्षांत हा अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाचा विनोद आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

शिंदे गद्दार नाही तर खुद्दार, सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच नाही…

तु्म्ही लोकांना देणार असाल तर महिलांसाठी अर्ध तिकीट नाही तर, १२०० वरून सिलेंडर ४०० वर आणून दाखवावा. जर तुम्ही देणारेच असाल, तर कापसाच्या भावाचं काय झालं ते सांगाव. हरभरा, गहू पिकाचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यावर तुम्ही का बोलत नाही ? जुन्या पेन्शनसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत का पोहोचत नाही ? मला वाटतं एकनाथभाऊतुम्ही फक्त डायलॉग मारतात. पण त्यांचा स्क्रिप्टरायटर त्यांनी बदलायला हवा”, असा खोचक टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube