नगरकरांनो सावधान! नगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

अहमदनगर – सध्या संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट आहे. राज्यातील बहुतांश मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळं शेतीपिकांसह घराचेंही मोठं नुकसान केलं आहे. मागील तीन-चार दिवसांपासून नगर जिल्ह्यातही सतत पाऊस सुरू आहे. दरम्यान,भारतीय हवामान खात्याने (IMD) जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आसरा […]

Untitled Design   2023 09 25T130746.464

HEAVY RAIN

अहमदनगर – सध्या संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट आहे. राज्यातील बहुतांश मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळं शेतीपिकांसह घराचेंही मोठं नुकसान केलं आहे. मागील तीन-चार दिवसांपासून नगर जिल्ह्यातही सतत पाऊस सुरू आहे. दरम्यान,भारतीय हवामान खात्याने (IMD) जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, आपत्तीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (District Disaster Management) प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील (Rajendra Kumar Patil) यांनी केलं आहे.

राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने चांगलंचं झोपडलं. नगर जिल्ह्यातही शनिवारी मुसळधार पाऊस झाला.या पावसांमुळं शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक घरात आणि गणेश मंडळांच्या मंडपात पाणी शिरलं होतं. शहरातील रस्त्यांनाही ओढ्यांचं स्वरुप आलं होतं. त्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला होती. दरम्यान, अशातच पुन्हा एकाद भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट दिला. हवामान खात्याने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार 28 सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार आहे.वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Kiran Mane Post: ‘अखेर स्वप्न सत्यात उतरलं.. ‘,किरण माने यांनी खरेदी केली आलिशान कार

या काळात शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असतांना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सुचना दिल्या आहेत. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा,असं आवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केलं आहे.

Exit mobile version