अहमदनगर : विरोधकांच्या छातूर-मातूर आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नसून आता विकासकामांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच नाव न लगावला आहे. विखे पाटील आज संगमनेरमध्ये वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, विरोधकांबद्दल जे काही सांगायचं आहे ते मी आधीच सांगितलं असून त्यांनी काय आरोप करावे हा त्यांचा प्रश्न असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलय. विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरातांना बाजीप्रभू देशपांडे खिंड सोडून पळत असल्याचं म्हंटल होतं. त्यानंतर आता विखे-थोरात दोघांमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध सुरु झाल्याचं स्पष्ट झालंय.
BHIMASHANKAR : भीमाशंकर देवस्थान पळवणे हा महाराष्ट्राचा मानभंग, वळसे पाटलांची भाजपवर टीका
विखे म्हणाले, विरोधकांना माझ्यावर काय आरोप करायचे आहेत ते करु देत आपली विकासकामे व्यवस्थित सुरु असून त्यांना काय सांगायचं आहे ते मी याआधीचं स्पष्ट केल्याचं ते म्हणालेत. वाळू माफियांवर प्रश्न विचारल्यानंतर विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना माझ्यावर आरोप करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Satyajeet Tambe : माझ्या ‘त्या’ ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही
विरोधक सोडले तर दुसरं कोणी मतदारसंघात विकासकामे झाली नसल्याचं म्हणत नसून आमची विकासकामे जोऱ्यात सुरु असून ठरलेल्या तारखेलाच विकासकामांच उद्घाटने सुरु असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.