उदयनराजे संतापले! संजय राऊतांची काढली लाज, म्हणाले…

सातारा : विकृत स्वभावामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून (Sanjay Raut)राजघराण्यावर वारंवार टीका केली जातेय. ही विकृती वाढत चाललीय. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभाय, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊत यांच्यावर […]

Udayanraje Bhosle

Udayanraje Bhosle

सातारा : विकृत स्वभावामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून (Sanjay Raut)राजघराण्यावर वारंवार टीका केली जातेय. ही विकृती वाढत चाललीय. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभाय, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवगर्जना मेळावा शुक्रवारी साताऱ्यातील पालिकेच्या शाहू कला मंदिरात झाला. त्यावेळी छत्रपतींचे वंशज आज ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर नाही. सातारचे प्रतापसिंह महाराज कधी झुकले नाहीत. पण, त्यांच्या वंशजांनी भाजपाशी तडजोडी केली, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

ईडी भाजप मंत्र्यांवर नाही तर फक्त विरोधकांवरच कारवाई करते, सिब्बलांचा केंद्रावर निशाणा

संजय राऊत यांची विकृती इथपर्यंत पोहोचली की त्यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळत असतात. त्यांचं हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थासाठीच केलेलं विधान आहे. त्यांचा हा निर्लज्जपणाचा कळस झालाय. प्रत्येक वेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं.

ज्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी लाज तरी राखा, अशा शब्दात उदयनराजेंनी राऊतांना सुनावलं. छत्रपतींचा आदर अनादर करण्याचा कोणाचा घास नाही, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.

Exit mobile version