धनगर आरक्षण प्रश्नी सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आल्यानंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी तोडफोड करणाऱ्या धनगर आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
आठवलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण खासदार, आमदार यांच्या आरक्षणाला विरोध
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच पेटल्याचं दिसतंय. धनगर आरक्षणासाठी जालन्यानंतर आता अहमदनगरमधील चौंडीमध्येही धनगर समाजाकडून उपोषण करण्यात आलं. त्यानंतर आढावा बैठकीसाठी गेलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. त्यानंतर धनगर आंदोलकाला सुरक्षा रक्षकांसह भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मारहाण केल्याचा आरोप धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांना तात्काळ निलंबित करा; कॉंग्रेसची मागणी
धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणाप्रमाणे शिक्षक भरती करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात येत असून त्यासाठीच आज दुपारच्या सुमारास धनगर समाजाचे कार्यकर्ते शरणू हांडे , अंकुश केरप्पा गरांडे, धनाजी विष्णू गडदे, सोमलिंग घोडके यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीत प्रवेश केला होता.
‘मी गीता, उपनिषदे वाचली, पण भाजपच्या कोणत्याही कृतीत हिंदूत्व नाही’; राहुल गांधींची परदेशातून टीका
त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तेथेच यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिका-यांची समन्वय बैठक घेत होत्या. हे कार्यकर्ते अचानकपणे आव्हाळे यांच्या बंद दालनात शिरले आणि घोषणा देत खुर्च्या-टेबलांची मोडतोड केली. खिडक्यांची तावदानेही फोडली. तसेच आव्हाळे यांच्या टेबलासह त्यांच्या नामफलकावर शाईफेक केली. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत गोंधळ उडाला.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीचे काम पूर्ण झाले आहे. यात शिक्षक भरतीमध्ये धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणाप्रमाणे ही शिक्षक भरती होत नाही, असा या आंदोलक कार्यकर्त्यांचा मुख्य आक्षेप होता. त्यानंतर या आंदोलकांनी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातील नामफलकावर शाईफेक करुन आंदोलन केलं.