‘मी गीता, उपनिषदे वाचली, पण भाजपच्या कोणत्याही कृतीत हिंदूत्व नाही’; राहुल गांधींची परदेशातून टीका

  • Written By: Published:
‘मी गीता, उपनिषदे वाचली, पण भाजपच्या कोणत्याही कृतीत हिंदूत्व नाही’; राहुल गांधींची परदेशातून टीका

Rahul Gandhi On BJP : काही महिन्यांपूर्वी परदेश दौऱ्यावर असतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली होती. देशात लोकशाही धोक्यात आली असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा राहुल गांधी हे युरोप दौऱ्यावर आहेत. परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोणत्याही किंमतीत सत्ता मिळवणे हे सत्ताधारी पक्षाचे ध्येय आहे. भाजपच्या (BJP) कोणत्याही कृतीत हिंदुत्व दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.

पॅरिसमधील सायन्सेस पो युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. या संवादाचा व्हिडिओ आज राहुल गांधींनी शेअर केला. यामध्ये राहुल यांनी देशातील अनेक महत्वाच्या घडामोडींवर भाष्य कें.

या व्हिडिओत ते म्हणतात की, मी गीता वाचली आहे. मी अनेक उपनिषदे वाचली आहेत. मी अनेक हिंदू पुस्तके वाचली आहेत; पण भाजप जे काही करते त्यात काहीही हिंदूत्ववादी नाही, अगदी काहीच नाही.. मी कोणत्याही हिंदू पुस्तकात वाचले नाही किंवा कोणत्याही विद्वान हिंदू व्यक्तीकडून ऐकले नाही की तुम्ही तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांचे नुकसान करा. त्यामुळं हिंदू राष्ट्रवाद हा चुकीचा शब्द आहे. ते हिंदू राष्ट्रवादी नाहीत. त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. मोदी सरकार आपला इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, ते कोणत्याही किमतीत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि सत्ता मिळवणयासाठी ते काही करतील, असं राहुल म्हणाले.

Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवताहेत; शरद पवारांचा घणाघात 

भारतात लोकशाहीवर हल्ला होत आहे, विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात आहे, स्वायत्त संस्था काबीज केल्या जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केला.

भारत-इंडिया वादावर राहुल यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, इंडिया म्हणजेच भारत असं आपल्या संविधानात लिहिलेलं आहे. हे दोन्ही नावे देशातील प्रत्येक लोकांचे प्रतिनिधीत्व करतात. पण सध्याचं सरकार हे विसरत चाललं आहे, असं ते म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube