Download App

जिल्हाधिकाऱ्यांचा एक फोन अन् वारकऱ्याचे वाचले ‘प्राण’

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. (Varakraya suffered a heart attack, collector of the ahmednagar provided immediate medical services )

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवार दि. 24 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील भातोडे या गावचे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला. यामुळे सोबतचे त्यांचे सहकारी हे गडबडून गेले. मात्र त्यांनी गोंधळून न जाता संयमाने एक महत्वाचे पाऊल उचलले.

Kiara Advani: कियारा आडवाणी प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवरुन चर्चांना उधाण ! 

पवार यांच्यासोबत असलेले वारकरी शामराव घोलप यांनी तातडीने “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचीमधून जिल्हाधिकारी यांचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. मध्यरात्रीची वेळ होती मात्र परिस्थिती गंभीर असल्याने घोलप यांनी थेट जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मध्यरात्री फोन करून घटनेची माहिती दिली. व तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.

दरम्यान जिल्हाधिकारी सालीमठ यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन क्षणाचाही विलंब न करता सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना रात्री मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास दूरध्वनीद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली व वारकरी पवार यांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्याची सूचना केली. सोलापूर प्रशासनाने तत्परता दाखवत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत वारकऱ्याला वैद्यकीय सेवा दिली. तत्परतेने व वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्याने पवार यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.

Tags

follow us