Dhananjay Mahadik : विशाळगडावरील अतिक्रमणाची संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांनी रविवारी तोडफोड केलीयं. या प्रकणानंतर खासदार शाहू महाराज आणि सतेज पाटलांनी विशाळगडावर पाहणी करीत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या भेटीवरुन भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी शाहू महाराजांसह सतेज पाटलांवर निशाणा साधलायं. हे तर पुतना मावशीचं प्रेम असल्याचं म्हणत महाडिक यांनी सडकून टीका केलीयं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
IAS पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच मांडली सविस्तर भूमिका… वाचा मसुरीला जाण्यापूर्वीचा खुलासा
पुढे बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, माजी पालकमंत्री धनंजय महाडिक हे लोकांना मदत करण्यासाठी गेले हे ढोंग असून पुतना मावशीचे प्रेम आहे. मागीलवेळी दंगल होणार असल्याचं सांगितलं होतं. पण तेच झालं. या सर्व वक्तव्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केलीयं.
‘विशाळगड प्रकरणात गुप्तचर विभागाकडे माहिती होती, मात्र सरकारने …,’ विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
खासदार शाहू महाराज यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाची तोडफोड करणाऱ्या शिवभक्तांना अतिरेकी असं संबोधनं हे दुर्देवी आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांचा अजेंडा हा आहे का? महाविकास आघाडी कोणासोबत आहे हे त्यांनी आधी जाहीर करावं, महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहे की अतिक्रमण केलेल्या नागरिकांसोबत आहे हे जाहीर करावं? असा खडा सवाल धनंजय महाडिक यांनी यावेळी केलायं.
तुम्ही संभाजीराजेंना थांबवलं का नाही?
विशाळगडावरील अतिक्रमण हे आत्ताचं नसून 15 ते 20 वर्षांपूर्वीचं आहे. प्रशासनाने संभाजीराजेंना का थांबवलं नाही म्हणता मग तुम्हीच का नाही थांबवलं? एकाच घरातून दोन भूमिका कशा असू शकता. एकाने पाडा म्हणायंच अन् दुसऱ्याने नका पाडू म्हणायंच, या शब्दांत धनंजय महाडिक यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटलांसह खासदार शाहू महाराजांवर कडाडून टीका केलीयं.