Sambhajiraje Chatrapati : विशाळगड (Vishalgarth) अतिक्रमण शिवभक्तांवर काढण्याची वेळ पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी का आणू दिली? असा थेट सवाल संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी केलायं. दरम्यान, विशाळगड अतिक्रमण तोडफोड प्रकरणी होत असलेल्या गंभीर आरोपांवर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्नांची सरबत्ती केलीयं. रविवारी विशाळगडावर अतिक्रमण तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश असतानाही सरकारने अतिक्रमणावर कारवाई केली नाही. शिवभक्तांनी जेव्हा अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली तेव्हा आता आरोप केले जात आहेत. अतिक्रमण काढण्याचे आदेश असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकाऱ्यांना कोण प्रश्न विचारणार? असा संतप्त सवाल संभाजीराजे यांनी यावेळी केलायं.
तसेच सरकाकडून इतर वेळी अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी बैठका घेतल्या जातात. एसआयडी, गोपनीय यंत्रणा वापरल्या जातात, विशाळगड अतिक्रमणाबाबत सरकारने ही यंत्रणा वापरली का नाही. सरकारनेच शिवभक्तांवर ही वेळ आणली असून इथल्या नेत्यांनी कधीच अतिक्रमणाबाबत आवाज उठवला नसल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय.
विशाळगडावर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहेत. विशाळगडासह पायथ्याला जवळपास 160 अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणाबाबत काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, प्रशासनाकडून ही अतिक्रमणे काढण्यात आलेले नाहीत. यातील काहीच अतिक्रमणे न्यायप्रविष्ट आहेत मात्र, इतर सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश आहेत. या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना काढण्याचे सांगितलं मात्र त्यांनी लाईटली घेतल्यानेच आम्ही शिवभक्तांनी अतिक्रमण मोहिम हाती घेतल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान परिसरातील वाहनांची आणि घरांची तोडफोड करण्यात आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या घटनेनंतर पोलिसांकडून आता या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलायं.