थोडा विचार करून भूमिका घ्यायला हवी होती; सतेज पाटील यांची संभाजीराजेंवर टीका

  • Written By: Published:
थोडा विचार करून भूमिका घ्यायला हवी होती; सतेज पाटील यांची संभाजीराजेंवर टीका

Satej Patil On Chhatrapati Sambhajiraje: विशाळगड ((Vishalgad ) येथे अतिक्रमणाच्या प्रश्नावरून झालेल्या तोडफोडप्रकरणी आता छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्या भूमिकेवर काँग्रेसकडून थेटपणे टीका केली जात आहे. संभाजीराजे यांचे वडिल व खासदार शाहू महाराज यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील ( Satej Patil) यांनीही आता संभाजीराजे यांच्या भूमिकेवर उघडपणे टीका केली आहे.


आपण शोधायचं का रोहित चौहानला? ‘लाईक आणि सबस्क्राईब’मध्ये होणार उलगडा

सतेज पाटील म्हणाले, अतिक्रमणाचा विषय हा न्यायप्रविष्ठ होता. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. कायदा व सुव्यवस्था न बिघडता अतिक्रमण कसे काढले जाईल विचार त्यांना केला पाहिजे होता. संभाजीराजे यांची चर्चा मुख्यमंत्र्यांशी होत नाही का? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

IAS पूजा खेडकरच्या कारनाम्यांचं सत्र सुरुच! दिव्यांग प्रमाणपत्रासाठी चक्क पत्ते बदलले…


जिल्हा पोलिस प्रमुखांना हटवा

विशाळगड येथे शांतता प्रस्थापित व्हावी, लोकांना दिलासा, आधार देण्यासाठी शाहू महाराज आणि आम्ही जाणार आहे. परंतु आता आम्हाला अडविले जाईल, असे सांगत जात आहे. कुठे थांबायचे, कुणाला अडवायचे हे नाटक जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने 13 आणि 14 जुलै रोजी करायला हवे होते. जिल्हा पोलिस प्रमुखांना खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्था राखायची काळजी होती तर सगळ्या गोष्टी माहीत होत्या. पुण्यातील लोक रात्री काय येतात. सगळ्या गोष्टी करतात काय ? त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांना हटविले पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे. अतिक्रमण काढण्याबाबत कुणीच नाही म्हटलेले नाही. ते काढावेच लागणार आहे. परंतु कोर्टामध्ये हा मॅटर आहे. त्यासाठी सरकारने किती प्रयत्न केले. त्या केसचा निकाल लावण्यासाठी, त्याची माहिती दिली पाहिजे आहे.

सरकारने चौकशी करावी

अतिक्रमण काढण्याबाबत कुठलंही दुमत नाही. कायद्याने ते झाले पाहिजे. जिल्हाधिकारी व प्रशासनाने तेथील लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. घटना वरती गडावर घडली आहे. पडसाद पायथ्याला गावात उमटले. तेथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख उपस्थित होते. तरी काही काळजी घेतली नाही. सर्व प्रकारची चौकशी सरकारने घेतली पाहिजे. तोपर्यंत प्रमुख जिल्हा प्रमुखाला बदलले पाहिजे, असे सतेज पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube