‘सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात’; धनंजय महाडिकांची खोचक टीका

‘सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात’; धनंजय महाडिकांची खोचक टीका

Dhananjay Mahadik On Satej Patil: कोल्हापुरात आमदार सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यातील वाद उफाळून आला आहे. सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात. ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही रुपयाचा निधी दिला नाही. त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यावेळी विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावा, अशी खोचक टीका धनंजय महाडिक यांनी यावेळी केली आहे.

आमदार सतेज पाटील यांच्याकडे बंगाली माणसे आहेत. जादूटोणा, ज्योतीष सांगणे हे त्यांनाच जमते. भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल तर शिवसेना घोषणा करेल. काँग्रेसच्या व्यक्तींना ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही, त्याची चिंता त्यांनी करू नये. ज्योतिष शास्त्र त्यांनी सांगू नये आमचे अंतर्गत विषय आम्ही ठरवू, अशी खोचक टीका धनंजय महाडिक यांनी यावेळी केली आहे.

सद्यस्थितीला आजच्या घडीला कोल्हापूर हातकणंगले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडेच आहेत. शिंदे गटाने बैठका घेणे हे क्रमप्राप्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या शेकडो बैठका यापूर्वी झालेले आहेत. अबकी बार 400 पार हा उद्देश ठेवूनच भारतीय जनताची तयारी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास एक जागा लढवण्यास आमची तयारी आहे. मात्र पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारणार. आणि लोकसभा लढवण्यास सांगितल्यास लढणार, असे यावेळी धनंजय महाडिक म्हणाले.

Lok Sabha 2024 : दक्षिणेत विखेंची कोंडी! आ. लंकेंच्या पत्नीही निवडणुकीच्या तयारीत

कालचा दिवस हा सहकारातील काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नव्हते. आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला. कालच्या मोर्चात शेतकरी कमी आणि गुंड जास्त झाले आहेत. एमडी चिटणीस यांना मारहाण करून सतेज पाटील यांनी गुंड प्रवृत्तीचे दर्शन दिले. हा एक पूर्वनियोजित गटाचा भाग आहे. हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्यावर मोका कारवाई करण्याची मागणी धनंजय महाडिक यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube