Sharad Pawar : लोणावळा येथील जाहीर सभेत काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच चिडले. आमदार सुनील शेळके यांच्यावर घणाघाती टीका करत पुन्हा दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहेत. सत्ताधारी महायुतीतील नेत्यांनी शरद पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. तरीदेखील शरद पवारांना इतका राग का आला? याचं उत्तर कुणी दिलं नव्हतं. या प्रश्नाचं उत्तर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी दिलं आहे.
शरद पवार मागील काही दिवसांपासून सगळीकडेच रागात बोलताना दिसत आहेत. त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचा हा परिपाक आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे खासदार रणजित निंबाळकर यांच्या विकासकामांच्या उद्घाटनानंतर शहाजीबापू बोलत होते.
लोणावळा येथील सभेत शरद पवार रागावले. त्यांनी आमदार सुनील शेळके यांना कडक शब्दात इशारा दिला. याबाबत विचारले असता शहाजीबापू म्हणाले, अजितदादांच्या भूमिकेमुळे जरी साहेब रागावले असले तरी अजितदादा यांचीच भूमिका बरोबर आहे. महायुती मोठी आहे. घटकपक्षांतील नेते काही जागांसाठी आग्रही आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. योग्यवेळी करेक्ट उमेदवारांची यादी समोर येईल, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
Sharad Pawar : ‘अमित शाहांनी मान्य केलं, मी त्यांचा आभारी’ शरद पवारांचं खोचक प्रत्युत्तर
काय म्हणाले होते शरद पवार?
कालच्या लोणावळ्यातील मेळाव्यासाठी तुम्ही येऊ नये यासाठी आमदारांनी आणि काहीजणांनी दमदाटी केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, टीका करणाऱ्यांना फोन करण्यात आल्याची तक्रार काही कार्यकर्तांनी माझ्याकडे केल्याचे पवारांनी सांगितले. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्यावर टीका करायची नाही का असा सवाल करत सुनील शेळकेंना (Sunil Shelke) फैलावर घेतले. ते म्हणाले की, तु आमदार कुणामुळे झाला त्यावेळी सभेला इथे कोण आलं होतं. त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता असा खडा सवाल पवारांनी आमदार सुनील शेळकेंना उद्देशून केला.