शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंसोबत जाणार; बंड करण्याचे महत्वाचे ‘4’ कारणं आले समोर

पक्षातील संभाव्य फुट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने हे पत्र पाठवले असलं तरी त्यातूनच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

News Photo   2026 06 17T094321.613

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार ठाकरेंची साथ सोडणार; बंडाचे महत्वाचे '4' कारणं आले समोर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena) पक्षाच्या खासदारांच्या स्वतंत्र गट अथवा अन्य पक्षात विलीनीकरणास मान्यता देऊ खासदार अरविंद सावंत यांच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवेले आहे. पक्षातील संभाव्य फुट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने हे पत्र पाठवले असलं तरी त्यातूनच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पक्षातील 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते आजच आपला वेगळा गट असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार असल्याची माहिती आहे. या चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरसाठी स्वत: एकनाथ शिंदेही दिल्लीत दाखलं झाले आहे. हे सगळं सुरू असताना ठाकरेंचे खासदार का वेगळे होत आहेत याबाबत चर्चा आहे.

अपना सपना मनी…मनी! ऑपरेशन टायगरसाठी प्रत्येकी 15 कोटींचा सौदा; संजय राऊतांचा मोठा दावा

खासदार ठाकरेंची साथ सोडण्याचे समोर आलेले कारण काय?

1) सत्तेची जवळीक आणि विकासनिधी

केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. मतदारसंघातील विरोधी पक्षातील लोक वारंवार विकास कामांवरून बोलत असतात. सलग 12 वर्षांपासून विरोधी पक्षात असल्याने विकास काम करण्यास अडथळे. जर सत्तेत सहभागी झालं तर मतदारसंघासाठी अधिक निधी व विकासकामे मिळवणं सोपे जाईल, अशी काही खासदारांची धारणा आहे. त्यामुळं हे सर्व खासदार सत्ताधारी गटासोबत जात असल्याची चर्चा आहे.

२) राजकीय भवितव्याची चिंता

गेली अनेक दिवसांपासून विरोधी पक्षात असल्याने विकास काम आणि कार्यकर्ते सांभाळन कठीण झालं. सत्तेत गेल्यास कार्यकर्ते साभाळण सोप होणार असून उरलेल्या काही दिवसांत विकास काम केल्यास पुढील निवडणुकांमध्ये विजयाची शक्यता आणि संघटनात्मक ताकद वाढेल. हे लक्षात घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भूमिका बदलण्याचा विचार होत असल्याचं बोललं जातं आहे.

3) पक्षातील नाराजी आणि संवादाचा अभाव

काही वर्षांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार घेऊ बंड केलं. त्यावेळी जे कारण आमदारांनी दिली तेच कारण यावेळी वेगळ होणारे खासदार सांगत आहेत. पक्षात निर्णय प्रक्रियेत पुरेसे महत्त्व मिळत नाही, स्थानिक पातळीवरील अडचणींकडं दुर्लक्ष होतं, पक्षनेतृत्वासोबत भेटणं चर्चा करण सहज सोप नाही. अनेकवेळा आवश्यक असताना भेट मिळत नाही, अशी काही नेत्यांची नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. यामुळं वेगळ होण्याचा निर्णय खासादरांनी घेतला असी चर्चा आहे.

4) मंत्रिपद व मोठ्या जबाबदाऱ्यांचे आकर्षण

गेल्या अनेक वर्षांत फक्त खासदार म्हणून काम करावं लागत आहे. त्यातही विरोधी पक्षातील खासदार असल्याने आणि आपल्या पक्षाकडून वारंवार सत्ताधारी पक्षावर टीका होत असल्याने काही काम मिळण कठीण झालं. कुठली महत्वाचं पद नाही. आता सत्ताधारी गटात गेल्यास महत्त्वाची पदं, समित्यांवरील संधी मंत्रिपद किंवा अधिक प्रभावी भूमिका मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगळा गट करून शिंदेंसोबत जाण्याची भूमिका खासदारांनी घेतल्याचं बोललं जात आहे.

Exit mobile version