Download App

आता आरक्षण घेऊनच मागं येणार अन्यथा…29 ऑगस्टच्या मोर्चाबद्दल काय म्हणाले जरांगे पाटील

आता मुंबईत आता मुंग्यांसारखी रांग लागणार आहे. मराठे आता तुफान ताकदीने मुंबईत येणार आहेत असं जरांगे यांनी म्हटलंय.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मी जर 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालो तर पुन्हा मागे येणार नाही,आता आरक्षण घेऊनच मागे येणार असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मैदानात (Jarange) उतरणार असल्याचं चित्र आहे. 29 ऑगस्टला पहिल्यापेक्षा 5 पट जास्त लोकं मुंबईत जाणार आहेत. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. जालन्याच्या जाफराबाद येथे एका कार्यक्रमानिमित्त मनोज जरांगे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आता मुंबईत आता मुंग्यांसारखी रांग लागणार आहे. मराठे आता तुफान ताकदीने मुंबईत येणार आहेत असं जरांगे यांनी म्हटलंय. मी जर 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालो तर पुन्हा मागे येणार नाही असं म्हणत आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय. आता मी मरेल किंवा विजय घेऊन येईल असं जरांगे म्हणालेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सर्वांनी राजकीय आणि सामाजिक मतभेद बाजूला ठेवून दोन दिवस मुंबईत यावं अस आवाहनही जरांगे यांनी केलंय.

कुणबी प्रमाणपत्र अडवण्यावरून जरांगे पाटील भडकले; मंत्री शिरसाटांवर केला गंभीर आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही 29 ऑगस्टच्या अगोदर मराठा आरक्षण द्या, नसता परिस्थिती आता बाहेर जाईल असा इशारा ही जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. दरम्यान, राज्यातील विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रोखलेले आहेत, ते तातडीने मार्गी काढा, अशी मागणीही जरांगे यांनीसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केलीय.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अंतरवली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली, त्यावेळी जरांगे यांनी प्रणिती शिंदेंचे स्वागत करत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. यापूर्वीच सर्व आमदार-खासदारांना अंतरवली सराटीमध्ये येण्याची विनंती मनोज जरांगे यांनी केली होती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे वर्षभरापासून आंदोलन करत असून 29 ऑगस्टला ते मुंबईकजं जाणार आहेत.

follow us