कुणबी प्रमाणपत्र अडवण्यावरून जरांगे पाटील भडकले; मंत्री शिरसाटांवर केला गंभीर आरोप

कुणबी प्रमाणपत्र अडवण्यावरून जरांगे पाटील भडकले; मंत्री शिरसाटांवर केला गंभीर आरोप

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. (Jarange) या बैठकीत राज्यभरातील मराठा बांधवांनी उपस्थिती लावली होतदी. यावेळी जरांगे पाटील यांनी मुंबईक आंदोलन करण्याची घोषणा केली. दरम्यान, जरांगे पाटील यांनी थेट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप केला आहे.

जरांगे पाटील यावेळी म्हणाले, आमची कागदपत्रं अडवली तर आम्ही शासकीय कार्यालयाला घेराव घालणार आहोत. मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत. आमच्या लेकरांचं वाटोळ होत असेल तर आम्हालाही कळतं सरकारला कस नीट करायचं, असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर देखील आरोप केला आहे. कुणबी सर्टिफिकेट देऊ नयेत यासाठी संजय शिरसाट हे अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

Maratha Reservation : जरांगे पाटील मुंबईत येणारच, आम्हाला.. शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांचं विधान

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात 29 ऑगस्टला हा मोर्चा मुंबईमध्ये जाणार आहे. 27 ऑगस्टला हा मोर्चा अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. त्यानंतर तो 29 ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहे. दरम्यान, आता या मोर्चाची तयारी सुरू आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे चावडी बैठका घेत आहेत, धाराशिव जिल्ह्यातल्या कार या गावात जरांगे पाटील यांची बैठक पार पडली,

या बैठकीत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे. तसंच, निघण्याच्या मार्गावरही बोलले आहेत. आंतरवलीतून 27 ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर नेप्टी नाका मार्गे, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर, मंत्रालय त्याचबरोब पर्यायी मार्ग म्हणून पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक, मुंबई असा असेल असही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube