Download App

‘तुम्हाला नेमकी अपेक्षा काय?’; पवारांची पाठराखण करीत आव्हाड पत्रकारांवरच चिडले…

Jitendra Awhad : तुम्हाला नेमकी अपेक्षा काय आहे, 83 व्या वर्षी शरद पवारांनी दररोज माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करावी का? असा खोचक सवाल करीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पत्रकारांवरच चिडले आहेत. दरम्यान, शरद पवार भाजपसोबत जाणार का? असा सवाल माध्यमांकडून करण्यात आला होता. दरम्यान, इंडियाच्या आयोजित बैठकीसाठी एनसीएमध्ये जितेंद्र आव्हाड दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Pune Crime : पुणे हादरलं! तलवार, कोयत्याने वार करत महापालिकेच्या दारातचंं तरूणाची हत्या

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांनी आपण भाजपसोबत जाणार नसून विचारधारा सोडणार नससल्याचं सांगोल्यात स्पष्ट केलं आहे. आता माध्यमांना नेमकी काय अपेक्षा आहे, 83 व्या वर्षी शरद पवारांनी दररोज माध्यमांसमोर येत हेच सागावं का? साहेबांनी भूमिका स्पष्ट केलीयं, ती जर तुम्हाला समजत नसेल तर आमचं दुर्देव असल्याचंही ते म्हणाले आहेत.

काळ्या उसाला 50 हजार रुपये प्रतिटन भाव; दुष्काळी बीडमधील शेतकऱ्याची कमाल!

काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या भेटीवर शरद पवारांना भाजपकडून ऑफर दिली असल्याचा आरोपही राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आपण कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नसून अजित पवार माझा पुतण्या म्हणूनच भेट घेतली? कुटुंबियांशी भेटणं त्यात गैर काय आहे? असाही उपरोधिक सवाल शरद पवारांकडून उपस्थित करण्यात आला होता.

Horoscope Today: या राशींचं पैशांचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागेल, दिवस आंनदात जाईल

त्यानंतर अजित पवारांनीही आपली भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं. उद्योजक अतुल चोरडीयांच्या घरी जेवणासाठी आम्हाला बोलवलं होतं, मी लपून नाहीतर उथळमाथ्याने फिरणारा कार्यकर्ता असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. दोन्ही पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता शरद पवारांना भाजपची ऑफर दिली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरुन राजकारणात वादंग पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार! जाणून घ्या प्रकरण…

कळवा घटनेवरुन टीका :
सत्ताधाऱ्यांनी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा हॉस्पिटल सुधारावं. आमच्या चूका जर झाल्या असतील तर आम्ही हॉस्पिटलसमोर जाऊन नाक घासून माफी मागायला तयार आहोत. पण 25 जणांचा मृत्यू झाला त्यांच काय करायचं ते ठरवा. तिथे काय काय कमी आहे ते बघा उगाच आपल्यावरचा दोष दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करू नका.

गंमतभेटींसाठी महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही; सामनातून टीकास्त्र

घटनेचा गांभीर्य असतं तर पाचव्या मिनिटाला तुम्ही तिथे आलं असता. दोन दिवस तिथे कोणी आलं नाही. त्यामुळे उगाच आम्हाला बोलायला लावू नका. मुख्यमंत्री आमचे शहराचे आहेत. त्यामुळे आम्ही जास्त टीकाटिप्पणी करत नाही. इतकं मोठं प्रकरण झाल्यानंतर ज्याची शरद पवारांनी दखल घेतली तरी आपल्याला यायला किती वेळ झाला हे जनतेला दिसत आहे.

तुम्ही या शहराबाबत किती गंभीर आहात हे शहराला दिसत त्यामुळे आमच्याकडे बोट दाखवू नका, आम्ही तुमच्याकडे बोट दाखवले नव्हती कारण नसताना आमच्यावर अंगावर शिंतोडे उडवू नका तुमच्या अंगावर जास्त उडतील, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

Tags

follow us