काही दिवसांपासून ठाण्यातल्या प्रशांत कॉर्नरची चांगलीच चर्चा सुरु आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्नी वृषाली शिंदे यांना चांगली वागणूक न दिल्याने प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर कारवाई करण्यात आल्याचं सोशल मीडियावर प्रसारित झालं. अफवा पसरवून कंपनीची बदनामी केल्याची तक्रार प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिली होती. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. स्वीट मार्टच्या कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतरच पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारची कारवाई करण्यात आल्याची चर्चा परीसरात सुरू झाली आहे.
Video : गतीमान शिंदे-फडणवीसांची नवी IT पॉलिसी नेमकी कशी?
नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांचे वाहनचालक आणि दुकानाचे सुरक्षारक्षक यांच्यात दुकानाबाहेर वाहन उभे करण्यावरून वाद झाला. त्यानंतर दुकानातही टोकन घेण्यावरून वाद झाला.
वृषाली शिंदे खरेदी न करताच रागारागाने दुकानाबाहेर निघून गेल्या. त्यानंतर, काही वेळातच ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ‘प्रशांत कॉर्नर’ दुकानाच्या बाहेरील शेड व इतर बांधकाम उध्वस्त केल्याचा, असा आरोप अजय जया यांनी केला होता.
Why Indian Rupee is falling: रुपयासाठी मे महिना सर्वात वाईट, केवळ एका महिन्यातच किंमत इतकी घसरली
ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात हे सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर हे मिठाईचे दुकान आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना बसण्यासाठी दुकानाबाहेरील भागात एक कट्टा आणि शेड बांधण्यात आलेला आहे. हा कट्टा आणि शेड बेकायदा असल्याचे सांगून ठाणे महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. मात्र, या दुकानाशेजारीच असणाऱ्या इतर दुकानांसमोरील कट्टे आणि शेड यांच्यावर कारवाई झालेली नव्हती.
Brijbhushan Singh : ‘नौटंकी करू नका… आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: फासावर जाईल’
एकंदरीत वृषाली शिंदे यांना योग्य वागणूक न दिल्यानेच ही कारवाई सुरु असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. अशातच धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांनी केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीला कोणतीही अपमानास्पद वागणूक मिळालेली नसताना आणि केवळ वाहन उभे करण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान जर, अशा पद्धतीने सूड उगवून होणार असेल तर, ठाणे शहरात नक्कीच ‘मोगलाई’ अवतरली आहे की काय? असेही त्यांनी म्हंटले होते.
जीवे मारण्याच्या धमकीनंतर राम शिंदेंचे रोहित पवारांकडे बोट, ‘असे राजकारण कर्जत-जामखेडमध्ये…’
अजय यांनी केलेले सर्व आरोप निराधार, खोडसाळ आहेत अशी घटना घडलीच नसून दुकानावर जी कारवाई झाली, ती महापालिका स्तरावर झाली असून आजूबाजूच्या दुकानांवरही झाली आहे. परंतु या कारवाईबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्या नावाचे पत्रक काढून उल्लेख केला आहे, तो चुकीचा असल्याचं आरोपावर प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मी वृषाली शिंदे यांना ओळखतही नसून या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाचे नाव जोडून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचं प्रशांत कॉर्नरचे मालकांनी म्हंटले आहे.