Brijbhushan Singh : ‘नौटंकी करू नका… आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: फासावर जाईल’

Brijbhushan Singh : ‘नौटंकी करू नका… आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: फासावर जाईल’

If the allegations made by the wrestlers are proved, I myself will be hanged, says Brijbhushan Singh : कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. दरम्यान, आता यावर ब्रृजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत: फासावर जाईल, असं बृजभूषण यांनी सांगितलं.

कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. ब्रृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, अशी या आंदोलकांची मागणी आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून केंद्र सरकारकडून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळं कुस्तीपटू आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळं काल त्यांनी आपली पदके थेट गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यावर बृजभूषण सिंह यांनी ताशेरे ओढत कुस्तीपटूंनीचे आरोप फेटाळले.

सिंह म्हणाले, चार महिने झाले आहेत आणि मला फाशी द्यावी अशी त्यांची इच्छा आहे. सरकार मला फाशी देत ​​नाही, म्हणून ते मंगळवारी हरिद्वार येथे जमले आणि त्यांनी आपली पदके गंगेत विसर्जित करण्याची धमकी दिली. गंगेत पदके विसर्जित केल्यानं मला फाशी मिळणार नाही. ही कुस्तीपटूंची फक्त नौटंकी आहे, असं बृजभूषण म्हणाले.

WTC Final 2023: ‘पंड्याला संघात न घेवून भारताने केली मोठी चूक’, रिकी पाँटिंगने सांगितले कारण

ते म्हणाले, कुस्तीपटूंकडे काही पुरावे असतील तर ते पोलिसांनी द्या.. न्यायालयात सादर करा, कोर्टानं मला कोणतीही शिक्षा दिल्यास मी ती शिक्षा स्वीकारण्यास तयार आहे. माझ्यापुढं उगाच नौटंकी करू नका… लैंगिक शोषण केव्हा झालं, कुठं झालं अन् कोणासोबत झालं, हे ही सांगा.. माझ्यावरील एकही आरोप सिध्द झाला तर मी स्वत: फासावर जाईल, असं ते म्हणाले.

महिला कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ब्रृजभूषण यांनी अनेक कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. ब्रृजभूषण यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावर कारवाई करावी, अशी कुस्तीगीरांची मागणी आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube