Download App

Video : धाराशिवला उजनीच पाणी आणण्याच्या योजनेचं काय झालं?, कैलास पाटलांनी इतिहासच सांगितला

आमदार कैलास पाटील यांनी लेट्सअपशी बोलताना भाष्य केलं आहे. संपादक योगेश कुटे यांनी आमदार पाटील यांना अनेक प्रश्नांवर बोलत केलं आहे.

  • Written By: Last Updated:

Kailas Patil on Ujni Dam Dharashiv Water : उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव जिल्ह्याचा विकास असा विषय निघाला की प्रश्न समोर येतो तो येथील नद्या आणि पाण्याचा. या जिल्ह्यात जास्त पाणी नाही, नद्या नाहीत. (Dam) बंधारे नाहीत त्यामुळे कायमदुष्काळजन्य स्थिती असलेला हा भाग आहे. 2004 ला उजणी धरणातून पाणी आणण्याचं अनेक राजकीय नेत्यांनी आश्वासन दिलं मात्र, वीस वर्ष होत आलं तरी त्याला काही मुहूर्त लागलेला नाही. यावरच आमदार कैलास पाटील यांनी लेट्सअपशी बोलताना भाष्य केलं आहे. संपादक योगेश कुटे यांनी आमदार पाटील यांना अनेक प्रश्नांवर बोलत केलं आहे.

2014 च्या विधानसभांच्या निवडणुकांपासून घोषणा होतात की उजणीचं पाणी आणणार आणणार मग आणखी का आलंनाही असं विचारलं असता कैलास पाटील म्हणाले, खर सांगायच तर आणखी पाणी आलेलं नाही. तसंच, हा सिंचन पार्ट टू होऊ शकतो असं म्हणत आमदार पाटील यांनी थेट सरकारवर वार केला आहे. मी याच्यामध्ये जलसंपदा मुख्यमंत्री विभागाला पत्रही दिलं आहे. तसंच, एका प्रकल्पाची किंमत 400 पट वाढल्याचा खळबळजनक दावाही पाटील यांनी केला आहे. 2004 ला घोषणा झाली तेव्हा 4 हजार 800 कोटींचा प्रकल्प होता. 7 टीएमसीचा प्रकल्प होता. खर म्हणजे आमच पाणी 23.66 टीएमसी पाणी आहे असंही ते यावेळी म्हणाले.

Video : माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना…ओमराजे निंबाळकरांनी सांगितली मनातली गोष्ट

दरम्यान, यामध्ये 7 टीएमसीच काम चालू आहे. परंतु, 4 हजार 800 कोटीचा प्रकल्प 12 हजार कोटीवर गेला हे कौतुकाने ही लोक सांगतात. पण, ही किंमत कशी वाढली याचं उत्तर व्यवस्थेने देण गरजेच आहे असं ही ते म्हणाले. हो मोट कॉंट्रॅक मिळालं आहे. आज शासन मान्यतेने सिंचन घोटाळ्यापेक्षा मोठा हा सिंचन घोटाळा पार्ट टू असा घोटाला आहे असा थेट आरोप कैलास पाटील यांनी केला आहे. याचे सगळे पुरावे मी गोळा करतोय. ज्या दिवशी हे सगळे पुरावे हाती येतील त्या दिवशी मी सर्व पुरावे महाराष्ट्रासमोर मांडणार असा थेट इशाराही आमदार पाटील यांनी दिला आहे.

अद्याप पाणी आलेलं नाही. त्याच कारण, मागिल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळातील जलसंपदा मंत्र्यांनी काही प्राध्यान्यक्रम घालून दिली होती. म्हणजे, पाणी मराठवाड्यासाठी, योजना मराठवाड्यासाठी, पैसे मराठवाड्यासाठी आणि काम पश्चिम महाराष्ट्रासाठी झाली असा थेट घणाघात पाटील यांनी केला आहे. पुढे उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यावर खासदार ओमराजे आणि मी पाठपुरावा करून मंत्र्यांनी जी प्राध्यान्यक्रमात अट घातली होती त्यामध्ये रामदऱ्यापर्यंतचा आणि कळंब तालुक्यातील धुळडवाडीपर्यंतचा समावेश आम्ही केला असं पाटील म्हणाले. त्यामध्येही एक वर्ष निवीदा प्रक्रिया पूर्ण होऊ दिली नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. हे दुसऱ्यांवर आरोप करतात पण हे अखंड बुडालेली आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

follow us

संबंधित बातम्या