Download App

मराठवाड्यावर पुन्हा पाणी संकट; तब्बल १५२ प्रकल्प कोरडे ठाक, जलसंपदा विभागाची माहिती काय?

मराठवाड्यात असणारे ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. प्रकल्पात ४९ टक्के

  • Written By: Last Updated:

Water Situation In Marathwada : मराठवाड्यात कायम पाण्याची टंचाई असते. महाराष्ट्रातील अनेक भागात पाणी असलं तरी मराठवाड्यात मात्र, कायम पाण्याची अडचण उभी असते. यावर्षीही काही प्रमाणात तीच स्थिती राहिलं असं दिसतय. मराठवाड्यातील एकूण ७५१ लघू प्रकल्पांपैकी २१ प्रकल्प कोरडे पडले आहेत. (Marathwada) याशिवाय १५२ लघू व सात मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा जोत्याखाली गेल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. झपाट्याने घटत चाललेला पाणीसाठा पुढे अडचणी निर्माण करू शकतो असं दिसतय.

धाराशिवच्या जिव्हाळ्याचा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार -राणाजगजितसिंह पाटील

मराठवाड्यातील कोरड्या पडलेल्या २१ लघू प्रकल्पांमध्ये बीड व धाराशिव मधील प्रत्येकी ७, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी तीन व लातूरमधील एका लघू प्रकल्पाचा समावेश. जोत्याखाली पाणीसाठा केलेल्या १५२ प्रकल्पात जालनातील २३ ,बीड मधील ४३, लातूरमधील ६, धाराशिवमधील ४१, नांदेडमधील १९, परभणी व हिंगोली मधील प्रत्येकी १० लघू प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामध्ये ७५१ लघू प्रकल्पांपैकी २५६ प्रकल्पातील पाणीसाठा २५ टक्क्यांपेक्षा कमी असून २१७ प्रकल्पातील पाणीसाठा २५ ते ५० टक्के, ६५ प्रकल्पातील पाणीसाठा ५० ते ७५ टक्के तर केवळ ३० प्रकल्पातील आणि साठा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या सात मध्यम प्रकल्पात बीड, धाराशिव व नांदेडमधील प्रत्येकी दोन, तर जालन्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी २४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ३७ प्रकल्पात २५ ते ५० टक्के, सहा प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर केवळ एका प्रकल्प ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, पाच प्रकल्पांत २५ ते ५० टक्के दरम्यान तर ४ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के दरम्यान पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

मोठ्या प्रकल्पांची स्थिती

मराठवाड्यात असणारे ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. प्रकल्पात ४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. येलदरी प्रकल्पात ५८ टक्के, सिद्धेश्वरमध्ये ६६ टक्के, माजलगावमध्ये २३ टक्के, मांजरामध्ये ४२ टक्के, ऊर्ध्व पेनगंगामध्ये ५६ टक्के, निम्न तेरणामध्ये ६१ टक्के, निम्न मनारमध्ये ४९ टक्के विष्णुपुरीत ३८ टक्के, निम्न दुधनांमध्ये ४१ टक्के, तर सीना कोळेगावमध्ये केवळ २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

उपयुक्त पाणीसाठा

मराठवाड्यातील ८७९ लघू मध्यम मोठ्या प्रकल्पांसह तेरणा मांजरा रेणा व गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये असलेला उपयुक्त पाणीसाठा ३८.८९ टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांतील सरासरी ४९.४० टक्के, ७५ माध्यम प्रकल्पात ३२ टक्के, ७५१ लघू प्रकल्पात केवळ २३ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये २६.२७ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

follow us