Download App

आम्हालाही आता याचा सोक्ष मोक्ष लावायचय; न्यायालयातील सुनावणीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची एक आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे,

  • Written By: Last Updated:

Shiv Sena Party and Symbol Hearing : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव हे शिवेसना शिंदे गटाला देण्याचा (Symbol) निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता, त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणावर आता ऑगस्टमध्ये सुनावणी होणार आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची एक आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे, जिथं या चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल. कारण आज आमचे जे चिन्ह चोरलं गेलं आहे ते चिन्ह कुणाला द्यायच हे ठवरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असला तरी पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा अधिकार निवडणूक आयोगाला नक्कीच नाही. त्यांना तो अधिकार असूच शकत नाही, आणि आम्ही तो मान्यही करत नाही. निवडणूक चिन्हाबाबत म्हणाल तर ठीक आहे, आणि त्याबाबत देखील प्रकरण कोर्टात आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, पोलीस महासंचालकांकडे तक्रार; भडकाऊ भाषण केल्याचा आरोप

इंडिया आघाडीची आता बैठक झाली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही, मला वाटतं लवकरात लवकर बैठक झाली पाहिजे. बिहारमध्ये निवडणुका आहेत, इतरही राज्यात निवडणुका आहेत, महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे बैठक तर झालीच पाहिजे असं मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं

न्यायालयात ज्येष्ठ विधितज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांनी या प्रकरणावर सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर ऑगस्ट महिन्यात तुम्हाला तारीख देतो असं न्यायालयानं सिब्बल यांना सांगितलं. आम्हालाही आता याचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे, असंही न्यायालयानं यावेळी म्हटलं आहे त्यामुळ ऑगस्ट महिन्यात न्यायालय निकल देणार अशीच सध्या चर्चा सुरू झाली आहे.

follow us