महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाती-जातीत कलह निर्माण केले आहेत. (Election) मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी भांडणे लावून महाराष्ट्रात द्वेष पसरवला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे सर्वात मोठे ‘आका’ असून त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी थेट मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
परळी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांना पुन्हा लक्ष केल आहे. त्याचबरोबर आकाचे आका इथ आहेत असंही ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, यावेळी मतदारांना आवाहन करताना तुम्हाला हे विकत घेण्याची तयारी करून आहेत. तुम्ही यावेळी यांना दूर लोटलं पाहिजे. कारण या परळीचं नाव घेतल की काही दिवसांपूर्वी खंडणीखोर, हप्तेखोर, धमकीखोर अशी ओळख झाली होती. परंतु, पऱळी हे स्वाभिमानी लोकांचं शहर आहे असंही यावेळी सपकाळ म्हणाले.
देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री, सर्व कारभार अमित शाह चालवतात; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
त्याचबरोबर पालिका निवडणुकांच्या निमित्ताने सपकाळ यांची पाथरी येथेही जाहीर सभा झाली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख आदिसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी सपकाळ म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा खोटा बुरखा फाडण्याची ताकद केवळ राहुल गांधी यांच्यामध्येच असून सामान्य माणसाची लढाई सध्या राहुल गांधी लढत आहेत. महाराष्ट्रात भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मदतीने जरी सरकार स्थापन केले असले तरी २०२९ ला भाजप स्वबळावर निवडणूक लढवील आणि या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवेल, असे यावेळी सपकाळ म्हणाले.
गरिबांचे मरण हेच भाजपचे धोरण आहे. भाजपच्या मंत्र्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला असून बंद पडलेले घड्याळ आणि उधार आणलेला धनुष्यबाण याच्या आधारे भाजपने महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग सुरू केला आहे असे यावेळी सपकाळ म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
