देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री, सर्व कारभार अमित शाह चालवतात; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीश्वरांना गाठले कारण देवेंद्र फडणवीस केवळ शॅडो मुख्यमंत्री

  • Written By: Published:
Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis

Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीश्वरांना गाठले कारण देवेंद्र फडणवीस केवळ शॅडो मुख्यमंत्री आहे. मूळ मुख्यमंत्री अमित शाह आहेत. सर्व कारभार अमित शाह चालवतात. ज्यांना ते सांगतात तेच मंत्री होतात. म्हणून छोट्या-छोट्या तक्रारी सुद्धा त्यांच्या कानावर घालाव्या लागतात. हे सरकार महाराष्ट्राचे स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीतून निर्णय करू लागली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. माध्यामांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांना शॅडो मुख्यमंत्री म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले की, भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सत्तेसाठी एकत्रित आले आहे, यांचा विचार एक नाही, त्यामुळे यांच्यात टोळी युद्ध अनेक दिवसांपासून सुरू आहे. शिंदे यांनी दिल्लीश्वरांना गाठले कारण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केवळ शॅडो मुख्यमंत्री आहे. मूळ मुख्यमंत्री अमित शाह आहेत. सर्व कारभार अमित शाह चालवतात. ज्यांना ते सांगतात तेच मंत्री होतात. म्हणून छोट्या-छोट्या तक्रारी सुद्धा त्यांच्या कानावर घालाव्या लागतात. हे सरकार महाराष्ट्राचे स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीतून निर्णय करू लागली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी क्लीन चीट मिळवण्यासाठी देखील अजित पवार यांना दिल्लीत जावे लागले होते. अब मारा तो मारा, फिर से मार कर देख अशातला हा प्रकार आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी अमित शाहांकडे हे जातात. यांच्यात टोळी युद्ध सुरू आहे. त्यामुळे हे वारंवार घडत असल्याच माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

तर दुसरीकडे यावेळी सरकाळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती होणार का? यावर बोलातना देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. स्थानिक पातळीवर ते निर्णय होतील. अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मुंबईत स्वबळावर लढावं अशी भावना आहे. त्यांच्या भावनेचा सन्मान पक्षाने करावा अशी आमची भूमिका आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आता जवळपास सर्वच पक्षांनी तशी भूमिका घेतली आहे. आघाडी युती संदर्भात स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहे. इंडिया अलायन्सच्या अंतर्गत आघाडी करण्यासाठीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहे. इंडिया अलायन्सच्या बाहेर आघाडी करायची असल्यास स्थानिक नेत्यांनी प्रस्ताव सादर करावे असे सांगण्यात आले आहे.

Nitish Kumar : राजपूत, भूमिहार, दलित, नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये कोणत्या जातीचे वर्चस्व?

शरद पवारांसोबत युती होणार?

शरद पवार इंडिया अलायन्सचे महत्त्वाचे नेतृत्व आहे. आघाडी संदर्भात त्यांच्याशी आमची चर्चा आणि समन्वय असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने काल आमचे नेते त्यांना भेटले आहे. नगरपरिषद निवडणुकांबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची एक समन्वय बैठक झाली होती. आजही संवाद होणार आहे अशा समन्वय बैठका अनौपचारिक स्वरूपात होत असतात. तिन्ही पक्षाचे जबाबदार नेते त्यात भेटतात. आजची बैठक समन्वयसाठी आहे असं माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

follow us