Download App

नमस्कार! मी उद्धव ठाकरे बोलतोय.., मनोज जरांगे पाटील यांना उद्धव ठाकरे यांचा फोन, काय झाली चर्चा?

उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मुंबईत आझाद मैदानात मनोज जरांगे (Jarange) पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसलेले आहेत. दरम्यान, जरांगे यांच्याशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली आहे. अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत दानवे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांचे जरांगे यांच्याशी बोलणं करून दिलं.

फोनद्वारे ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली याबाबत जरांगे यांनी माहिती दिली आहे. इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत आला, हे पाहून उद्धव ठाकरे अचंबित झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसंच, सरकारने तुमच्या मागण्यांवर विचार करायला हवा, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीदेखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे.

 

follow us