मराठा समाज अन् आमच्यात अंतर पडल ते या दरिंदे पाटलामुळे; भुजबळांची बीडमधून जरांगेंवर टीका

आजही मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आमचा मराठा समाजाला विरोध नाही. परंतु, या दरिंदे पाटलांमुळे आमच्यात अंतर पडलं.

Bhujball

Bhujball

आम्ही दिवाळी कशी साजरी करावी?, आमचं ओबीसी आरक्षण गेलं आहे. (OBC) १५ ते १६ आमच्या मुलांनी आत्महत्या केली आहे. (OBC) हे दु:ख असताना आम्ही कशी दिवाळी साजरी करावी? असा प्रश्न उपस्थित करत मराठा समाजात आणि आमच्यात अंतर पाडलं ते अंतरवलीच्या जरांगे पाटलाने पाडलं असं म्हणत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केला. ते बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत होते.

आजही मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आमचा मराठा समाजाला विरोध नाही. परंतु, या दरिंदे पाटलांमुळे आमच्यात अंतर पडलं असं म्हणत जरांगे यांच्यावर भुजबळ यांनी टीका केली. तसंच, त्याला काय कळत अशा भाषेत जरांगे यांची खिल्ली भुजबळ यांनी यावेळी उडवली. तसंच, मुंबईत तुम्ही एक दिवस थांबला असता आणि आम्ही पोलिसांना सांगितलं असत तर तुम्हाला पळता भुई थोडी झाली असती असही भुजबळ म्हणाले.

तुम्ही भुजबळ सोडा ओबीसी कार्यकर्त्यालाही हात लावून दाखवा; ओबीसी एल्गार मेळाव्यातून हाकेंचा इशारा

मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणासाठी आम्ही पाठिंबा दिला. मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले, जाट, गुर्जर यांचे मोर्चे निघाले. मोदींनी ईडब्ल्यूएस आणलं आणि सांगितलं काही घटक शिक्षणात, आर्थिकदृष्टीने मागे आहेत, पण सामाजिकदृष्टीने मागे नाहीत, त्यामुळे त्यांना रिझर्व्हेशनमध्ये जागा देता येत नाही. एका ईडब्ल्यूएसमध्ये १० पैकी ८ मराठा समाजाचे लोक निवडून आले, तरी म्हणतात मराठा समाजाला आरक्षण हवं, आम्ही म्हटलं द्या. आता म्हणतात ओबीसीतच पाहिजे, कोण म्हणतंय, ज्याचा अभ्यास नाही, असा टोलाही यावेळी भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना यावेळी लगावला आहे.

आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा नारा नाही. ५४ टक्के ओबीसी ३७४ जाती, १३ टक्के दलित बांधव, ७ टक्के आदिवासी, ३ टक्के ब्राह्मण, त्यानंतर मुस्लिम आणि मग शिल्लक राहतात ते मोजा, तो मराठा समाज आहे. पण ६० टक्के आम्ही, ५० टक्के आम्ही, पाच कोटी मुंबईत आणणार, सरकारने नरमाईने घेतलं म्हणून दादागिरी दिसली, पोलिसांना सांगितलं असतं कामाला लावा, एक रात्र थांबायला पाहिजे होतं, पोलिसांनी रस्ता साफ केला होता, हे कोण होते? मराठा समाजाचे लोक नाही. हे दारूवाले, वाळूचोर हे त्याचे लोकं होते, दरिंदे पाटलाने आणलेले लोक, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version