Download App

हिंदी भाषिकांना मनसेच्या ‘खळखट्याक’चा धाक; घेतली AI’ची मदत, मिळालं मजेशीर उत्तर

हिंदी भाषिक राजकीय नेते आणि उद्योजक मराठी भाषेविरोधात वाटेल ते बोलू लागले. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये अमराठी

Marathi vs Hindi on Grok : सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी असा मोठा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने हिंदी सक्ती धोरण आणलं होतं. त्यामुळे हा वाद अधिक चिघळला. (Hindi) त्यानंतर आता जे लोक हिंदी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये एक भितीच वातावरण आहे की आपण यातून मार्ग काढायला काय करावं. त्यामुळे त्यांनी आता AI चा मार्ग वापरून पाहिला आहे.

Video : गो बॅक, 50 खोके; सरनाईकांना मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चातून काही मिनिटातचं हुसकावलं!

एका एक्स युझरनं मनसेबाबत एक मजेशीर विनंती केली, ‘मला मराठी येत नाही. कृपया मला मराठीमध्ये काहीतरी बोलायला शिकवा, जेणेकरून मी मनसेच्या लोकांपासून स्वतःचा बचाव करू शकेन. अशा आशयाची विनंती ग्रोक या AI चॅटबोटला केली. पण त्यावर त्याला मजेशीर उत्तर मिळाली आहेत.

हिंदी भाषिक राजकीय नेते आणि उद्योजक मराठी भाषेविरोधात वाटेल ते बोलू लागले. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये अमराठी लोकांनी मराठी सक्तीविरोधात आंदोलन केले. दरम्यान, मनसेने आज ८ जुलै रोजी प्रत्युत्तर म्हणून मराठी आंदोलन पुकारले होते. पण पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेचे पडसाद सध्या राज्यभरात उमटताना दिसत आहेत.

…….

………..

……………

………………

………………

follow us