Download App

संपाच्या आडून अजेंडा चालविणारे महाभाग कोण? आंदोलनातल्या ‘त्या’ व्हिडीओ वरून चित्रा वाघ आक्रमक

  • Written By: Last Updated:

“सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण? संपातील एक महिला कर्मचारी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर व देवेंद्र फडणवीसजी यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे.” अशी मागणी भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेसाठी मोर्चा चालू होता. त्या मोर्चा दरम्यान अनेक भागात आंदोलने झाली. यावेळी सरकारच्या विरोधात भूमिका मांडताना काही ठिकाणी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्त्यव्य केली गेली. हाच मुद्दा धरून चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून चित्रा वाघ यांनी पोलिसांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पंकजा मुंडेंना थेट पंतप्रधान व्हायचयं?; परळीतील विधानानं चर्चांना उधाण

 

काय लिहले आहे चित्रा वाघ यांनी?

चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर तशी पोस्ट लिहली आहे. आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण? संपातील एक महिला कर्मचारी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर व देवेंद्र फडणवीसजी यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..! मोर्चा…आपल्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी संविधानाने दिलेलं हत्यार आहे पण त्यात हे असं वक्तव्य एखादी “सटवी”च करू शकेल

FB वर दुसऱ्याची पोस्ट शेअर केली म्हणून मागच्या सरकारने एका मुलीला थेट तुरूंगात पाठवल…इथे तर थेट हातात माईक घेऊन अपशब्द बोलले गेले हा देशाचे पंतप्रधान व राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का? पोलिसांनी स्युमोटो अंतर्गत कारवाई करावी

सरकारी यंत्रणेतील हे राजकीय पाताळषडयंत्री एकतर संघटनेने शोधून बाजूला सारावे नाहीतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तरी त्यांना घरी बसवावे
आम्ही शोध घेतला तर सापडायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे! देवेंद्र फडणवीस कदाचित मनाचा मोठेपणा दाखवतील पण आम्ही क्षमा करणार नाही आणि खपवून तर मुळीच घेणार नाही..!

‘लव्ह जिहादचा’ वाद पेटणार?; पत्रकार परिषदेत व्हिडिओ सादर करत नितेश राणेंचे खळबळजनक खुलासे

Tags

follow us