पंकजा मुंडेंना थेट पंतप्रधान व्हायचयं?; परळीतील विधानानं चर्चांना उधाण
Pankaja Munde Statement On PM Post : गेल्या काही दिवसांपासून भाजपात पंकजा मुंडे (Pankaja Munde ) नाराज असल्याच्या चर्चांनी उत आणला होता. पंकजा मुंडे भाजपला रामराम करणार अशादेखील चर्चा मध्यंतरीच्या काळात रंगल्या होत्या. मात्र, आपण पक्षात किंवा पक्षातील नेत्यांवर नाराज नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. परंतु, आता पंकजा मुंडेंना एखादं मंत्रीपदाची नव्हे तर, थेट देशाचं पंतप्रधान पद भूषवायचं आहे. परळीतील जल जीवन कार्यक्रमात त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ‘देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का ? असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पंकजा मुंडेंनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
‘लव्ह जिहादचा’ वाद पेटणार?; पत्रकार परिषदेत व्हिडिओ सादर करत नितेश राणेंचे खळबळजनक खुलासे
विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान पंकजा यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चादेखील झाली होती. परंतु, निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेंना पराभवला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता पंकजा यांनी थेट पंतप्रधानपदाबाबत भाष्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे मुंडेंना एखाद्या मंंत्री पदाची नव्हे तर, थेट पंतप्रधान पदाचे वेध लागल्याचे बोलले जात आहे.
खासदार सुजय विखेंची माणुसकी! रस्त्यात बंद पडलेल्या कारला स्वत: दिला धक्का…
पंकजा म्हणाल्या की, एकदा मी शेजारच्या गावात गेले तर तिथले लोक म्हणत होते. त्यावेळी नागरिकांनी आम्ही तुम्हाला तुम्ही फक्त महिला म्हणून मत दिलं नाही. त्यावर मी असा प्रश्न का विचारला तर, गावकऱ्यांनी सांगितले की, महिला विकास करु शकत नाही. एवढं देऊन पण म्हणतात, महिला विकास करु शकत नाही. आज देशाची पंतप्रधान स्त्री झाल्याचे सांगत मग तुमची लेक या पंतप्रधान नाही होऊ शकत का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना करत यासाठी तुम्ही एकजुटीने साथ द्यायची असते असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आपणच असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, आता पंकजांनी थेट पंतप्रधान पदाबाबच विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पंकजांना राज्यातील नव्हे तर, देशातील राजकारणात सक्रीय व्हायचे वेध लागल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच पंकजा यांच्या मनात नेमकं काय सलतंय याबाबतही विविध चर्चांना यामुळे सुरूवात झाली आहे. पंकजांच्या या विधानानंतर आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून यावर नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.