खासदार सुजय विखेंची माणुसकी! रस्त्यात बंद पडलेल्या कारला स्वत: दिला धक्का…

खासदार सुजय विखेंची माणुसकी! रस्त्यात बंद पडलेल्या कारला स्वत: दिला धक्का…

मुंबई : मुंबईतील रस्त्यावर एका बंद पडलेल्या गाडीला धक्का स्वत: धक्का देत एक खासदारही गाडीला धक्का मारु शकतो हे सुजय विखेंनी दाखवून दिलंय.मुंबईतील रस्त्यांवर कोण कोणासाठी थांबून मदत करतं असं क्वचितवेळा पाहायला मिळतं. याचीच प्रचिती घडलीय.पावसामुळे भर रस्त्यात बंद पडलेल्या एका कारला तिघे जण धक्का देत आहेत. यामधील एक जण स्वत: लोकसभेचा सदस्य आहे. लोकसभेचा खासदार दुसऱ्यांना मदत करण्यासाठी गाडीला धक्का देत असेल ही गोष्ट नवीनच आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर चारचाकी बंद पडलीय, कोणीच मदतीसाठी थांबत नाहीये, अशातच अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील मुंबईहुन अहमदनगरला येत होते. रस्त्यात गाडी बंद पडली आहे, अन् कोणीच कारचालकाच्या मदतीसाठी नाही.

हे लक्षात आल्यानंतर स्वत: खासदार सुजय विखे पाटील यांनी गाडीला धक्का मारत गाडी सुरु करण्यासाठी प्रयत्न केला. शेवटी खासदार गाडीला धक्का मारुन लोकांच्या मदतीला येतो, हे सुजय विखेंनी जनतेला दाखवून दिलं आहे.

गृह मंत्रालयाचा सोनिया गांधींना दणका; निकटवर्तीयाची सीबीआय चौकशी होणार

दरम्यान, या सर्व गोष्टी सुरु असतानाच मुंबईतील एक चाकरमानी आपलं ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात होता. मुंबईत असे प्रसंग कमी वेळा दिसतात म्हणून त्याने सुजय विखे गाडीला धक्का देत असतानाचे चित्र टिपले.

कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटल्याची मत या व्यक्तीने व्यक्त केलंय.

एवढंच नाहीतर या चाकरमानी व्यक्तीने खासदार सुजय विखेंचा गाडीला धक्का देतानाचा फोटो स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करत ‘असे खासदार सर्वांनाच मिळो’ अशी अपेक्षा देखील व्यक्त केलीय.

दरम्यान, देशातल्या आत्तापर्यंतच्या इतिहासात एखादा खासदार एका अनोळखी व्यक्तीला मदत करण्यासाठी त्याच्या गाडीला स्वत: धक्का देत असल्याची ही पहिलीच घटना असावी, असं मतही समाजमाध्यमांवर अनेकांनी व्यक्त केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube