Download App

मणिपूर हिंसाचारामध्ये धुमसत असतांना पंतप्रधान मोदी गप्प का? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घडत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव गमवावा लागला होतो. अजूनही हिंसाचाराच्या घटन घडत असून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या दौऱ्यानंतरही हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केलं. पंतप्रधान मोदींनी मणिपूर हिंसाचारावर मौन बाळगून का आहेत, असा सवालही त्यांनी केला. (Why Prime Minister Narendra Modis silence on Manipur violence Raj Thackerays question)

राज ठाकरे यांनी ट्विट करून केंद्र सरकारला पत्र लिहिलं त्यातं त्यांनी लिहिलं की, ईशान्य भारतातील मणिपूर राज्य अक्षरशः असंतोषाने धुमसत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या घरावचर लोकांनी संतापाने हल्ला केला. हे सगळं गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे आणि तरीही केंद्र सरकार परिस्थिती नियंत्रणात का अपयशी ठरत आहे हे कळत नाही, असा सवाल केला.

त्यांनी लिहिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्य भारताकडे कॉंग्रेसनं दुर्लक्ष केल्याबद्दल दुषणं द्यायचे. पण आज त्यांच्या कार्यकाळात ईशान्य भारतातील एका राज्य धुमसत असताना पंतप्रधान गप्प का आहेत हे आज माझ्या समजण्यापलीकडचे आहे. मध्यंतरी गृहमंत्री अमित शाह चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले पण परिस्थिती नियंत्रणात का आली नाही? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही दिवसांपूर्वी या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली होती. निदान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कारवाई होईल, असे वाटले होते.

युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट कंत्राटदारांकडूनच; आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका 

असो, मणिपूरचे सध्याचे नेतृत्व परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरत असेल, तर भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने योग्य तो निर्णय घ्यायला हवा. अटलजींनी ईशान्येकडील राज्यांना एका प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र सध्या मणिपूरकडे ज्या प्रकारे दुर्लक्ष होत आहे, ते पाहता हे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. जर मणिपूरला वेळीच शांत केले नाही आणि तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर घातली नाही, तर केवळ मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून वेगळ होण्याचा विचार जोर पकडेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

दरम्यान, ईशान्य भारतात देशापासून वेगळा झाला तर आणि त्याला सरकार जबाबदार असेल.

त्यामुळे माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे की त्यांनी ठोस पावले उचला आणि मणिपूर पूर्वकत होईल हे पाहा, असं राज ठाकरे म्हणाले.

Tags

follow us