Why the stupidity Sambhaji Brigade strongly criticizes Sanjay Gaikwad : शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार झाली असून आत्ता या प्रकरणी संभाजी ब्रिग्रेडतर्फे देखील या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
वाराणसी ते स्पिरिट: 2027 मध्ये पॅन-इंडिया सिनेमाची व्याख्या बदलणाऱ्या चित्रपटांचा महाउत्सव!
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे म्हणाले की आमदार गायकवाड अशिक्षित माणसाने शिवाजी कोण होता? हे पुस्तक वाचलं का? या पुस्तकातील चार पानं ज्या व्यक्तीने वाचले नाहीत त्याला पुस्तकाचे महत्व काय कळणार? लोकांच्या मेंदूला खोट्या इतिहासाने घाण करून टाकलं होतं, त्यांच्या मेंदूला शिवाजी कोण होता या पुस्तकांने तालावर आणलं! स्वच्छ केलं, हे गायकवाड यांना कदाचित माहिती नाही. मुळात एखाद्या प्रकाशकाला धमकी देणं हाच मुळात इतिहास माहीत नसलेला बिनडोकपणा आहे अस यावेळी ते म्हणाले.
“पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत दिसणार” ‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये स्नेहल शिदमची हटके एन्ट्री
ते पुढे म्हणाले की पानसरेंच्या मृत्यूची चेष्टा करणं किंवा प्रकाशाला धमकी देणे हीच खरी विकृती आहे आणि याला एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थन आहे का? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे.खरा इतिहास वाचा, चांगली पुस्तकं वाचा आणि मग शहाणपणाचे डोस पाजा? आत्ता आमदार गायकवाड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अस म्हणत संतोष शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
